घरात चांगले संस्कार झाले असते, तर गद्दारी केली नसती; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल 

Mumbai – विधीमंडळ अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी शिंदे गटाच्या (Shivsena rebel mla) आमदारांनी थेट शिवसेना नेते आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनाच लक्ष्य केले आहे. शिंदे गटाच्या आमदारांनी विधीमंडळांच्या पायऱ्यावर आदित्य ठाकरे यांचे घोड्यावर उलट्या दिशेने बसलेल्या व्यंगचित्राचे बॅनर झळकावत घोषणाबाजी केली.आदित्य ठाकरे यांच्याविरोधात शिंदे गटाने बॅनर, घोषणांचे बॅनर झळकावत घोषणाबाजी केली.

बॅनरवर शिंदे गटाने ‘महाराष्ट्राचे परम पूज्य (प पु) युवराज’ असा बॅनर झळकावला. या बॅनरवर आदित्य ठाकरे यांचे घोड्यावर उलट दिशेने बसलेले व्यंगचित्र आहे. घोड्याचे तोंड हिंदुत्वाच्या दिशेने असून आदित्य यांचे तोंड महाविकास आघाडीकडे असल्याचे दाखवण्यात आले. वर्ष 2014 मध्ये 151 चा हट्ट करत युती बुडवली, 2019 मध्ये खुर्चीसाठी हिंदुत्वाची विचारधारा पायदळी तुडवली अशी घोषणा होती. आदित्य ठाकरेंची दिशा चुकली. पर्यवरण खातं त्यांनी घरात राहून सांभाळलं, अश्या घोषणा यावेळी देण्यात आल्या.

दरम्यान आज सत्ताधाऱ्यांनी थेट शिवसेना आमदार आदित्य ठाकरे यांच्यावर निशाणा साधला यानंतर आदित्य ठाकरेंनी त्यांना थेट आव्हान दिले आहे. आदित्य ठाकरे म्हणाले कि, आमदारांची आपल्याला कीव येते, असे आदित्य ठाकरे विधानभवनात माध्यमांना दिलेल्या प्रतिक्रियेत म्हणाले आहेत. गळ्यात पोस्टर लावून त्यांना कसे उभे केले आहे हे अख्खा महाराष्ट्र पाहत आहे. एका मंत्रीपदासाठी या गद्दार सरकारमध्ये किती काय करायला लागते. मला खरोखर यांची कीव येते. यांच्यावर घरात चांगले संस्कार झाले असते, तर आधी गद्दारी केली नसती आणि असे बिचाऱ्यासारखे उभे राहिले नसते, असे आदित्य ठाकरे म्हणाले.