ज्येष्ठ गणितज्ञ आणि लेखिका डॉ. मंगला नारळीकर यांचे निधन

पुणे : ज्येष्ठ गणितज्ञ  आणि लेखिका डॉ. मंगला नारळीकर यांचे निधन झाले. वयाच्या ७९ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. पुण्यातील राहत्या घरी डॉ. मंगला नारळीकर यांची प्राणज्योत मालवली. ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांच्या पत्नी असलेल्या डॉ. मंगलाताई यांचीही स्वतंत्र ओळख होती. गणिताच्या क्षेत्रात त्यांचे योगदान मोठे होते.(Senior Mathematician and Writer Dr. Mangala Narlikar passed away)

डॉ. मंगला नारळीकर यांच्या मृत्यूने नारळीकर कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. डॉ. मंगला नारळीकर यांच्याकडे ‘संश्लेषात्मक अंक सिद्धांत’ या विषयात त्यांची पीएच.डी. होती. तसेच ‘गणितगप्पा’, ‘गणिताच्या सोप्या वाटा’ यांसारखी पुस्तक त्यांनी लिहिली.

१९८६ साली वयाच्या ४३ व्या वर्षी कॅन्सरशी सामना करायची वेळ त्यांच्यावर आली होती. कॅन्सर सारख्या दुर्धर आजारावरही डॉ. मंगला नारळीकर यांनी मात केली होती. गेले काही महिने त्यांना कॅन्सरचा पुन्हा एकदा त्रास सुरू झाला होता.