संत तुकाराम महाराज यांच्या वारीत सहभागी होऊन आमदार आशिष शेलार यांनी घेतले दर्शन

इंदापूर – टाळ मृदुंगाचा गजर करीत पंढरपुराच्या दिशेने निघालेल्या जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या पालखीचे आज इंदापूर येथे आगमन झाले. इंदापूर येथे माजी आमदार हर्षवर्धन पाटील यांच्यासह मुंबई भाजप अध्यक्ष आमदार अँड आशिष शेलार, शिवसेना खासदार राहुल शेवाळे, भाजपा खासदार धनंजय महाडिक यांनी स्वागत केले.

आमदार आशिष शेलार आणि हर्षवर्धन पाटील यांनी तुकोबांच्या पालखी रथाचे सारथ्य केले. त्यानंतर इंदापूरच्या शाळेच्या पटांगणात गोल रिंगण पार पडले या रिंगणातही स्वतः हर्षवर्धन पाटील आणि आमदार अँड आशिष शेलार, वारकऱ्यांसोबत टाळ मृदुंगाच्या गजरामध्ये सहभागी झाले. वारकऱ्यांसोबत फुगड्या घातल्या. तुकोबांच्या पादुकांचे दर्शन घेतले.