विराटने मोडला सचिनचा २० वर्षे जुना विक्रम, बनला विश्वचषकातील ‘धावांचा बादशहा’!

Virat Kohli Breaks Sachin Tendulkar Record: भारताचा महान फलंदाज विराट कोहलीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे. तो विश्वचषकात सर्वाधिक धावा करणारा (Most Runs In ODI World Cup) फलंदाज ठरला. कोहलीने बुधवारी (15 नोव्हेंबर) मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर झालेल्या विश्वचषक उपांत्य फेरीच्या सामन्यात (IND vs NZ Semi Final) न्यूझीलंडविरुद्ध 80 धावा करून ही कामगिरी केली. विराटने या बाबतीत महान फलंदाज सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला.

सचिनने 2003 विश्वचषकात 11 डावात 673 धावा केल्या होत्या. कोहलीने विश्वचषकातील 10 डावांमध्ये त्याच्यापेक्षा जास्त धावा केल्या आहेत. सचिनने 2003 मध्ये एक शतक आणि सहा अर्धशतकं झळकावली होती. स्पर्धेत सर्वाधिक धावा केल्याबद्दल त्याला सुवर्ण बॅट मिळाली होती. तेंडुलकरच्या शानदार खेळीमुळे टीम इंडिया फायनलमध्ये पोहोचली, पण विजेतेपदाच्या लढतीत ऑस्ट्रेलियाविरुद्ध पराभवाला सामोरे जावे लागले.

महत्वाच्या बातम्या-

Apple लवकरच OLED डिस्प्लेसह IPad Air आणि IPad Pro चे दोन नवीन मॉडेल लॉन्च करणार?

Latur News : महाराष्ट्राची मान शरमेने झुकली; सत्तरी ओलांडलेल्या मौलानाने केले मोठे कांड

पाकिस्तानी क्रिकेटर अब्दुल रज्जाकने ऐश्वर्यावर केली अश्लील टिप्पणी केली,म्हणाला,…