Sujay Vikhe Patil | लोकसभा निवडणुकीत निलेश लंकेंचं आव्हान वाटतं का? सुजय विखे पाटलांचं रोकठोक उत्तर!

Sujay Vikhe Patil vs Nilesh lanke | अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर विधानसभा मतदारसंघाचे आमदार निलेश लंके यांनी काल अखेर आमदारकीचा राजीनामा दिला. विधानसभा अध्यक्षांना आपण राजीनामा पाठवत असून शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली अहमदनगर मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवणार असल्याची घोषणाही त्यांनी केली. भाजपकडून (BJP) अहमदनगरच्या जागेवर विद्यमान खासदार सुजय विखे पाटील यांना पुन्हा एकदा उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे अहमदनगर लोकसभा मतदारसंघात सुजय विखे पाटील (Sujay Vikhe Patil) विरुद्ध निलेश लंके लढत होणार हे जवळपास निश्चित झाले आहे. या पार्श्वभूमीवर सुजय विखे पाटील यांनी भाष्य केले आहे.

निलेश लंके यांची उमेदवारी जवळपास निश्चित झाल्याने काही आव्हान वाटते का? या प्रश्नाला उत्तर देताना सुजय विखे म्हणाले की, समोरून कुणीही उमेदवार असला तरी मी माझी रणनीती बदलत नाही, मी माझ्या कामाच्या आधारावर जनतेसमोर जाणार आहे मी कधीही कुणाला कमी लेखत नाही आणि समोर कोण आहे त्यावरून रणनीती बदलत नाही. मी जी रणनीती ठरवली आहे. त्यानुसार मी काम करतो, असं सुजय विखेंनी म्हंटले आहे.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

शिवसेना शिंदे गटाने जाहीर केली उमेदवारांची पहिली यादी, पाहा कोणाला मिळालं तिकीट?

Nana Patole | लोकशाही व संविधान वाचवण्यासाठी लोकसभा निवडणुकीत एकजुटीने लढण्याची गरज

Prakash Ambedkar | ‘वंचितच्या पाठीत खंजीर खुपसला’! आंबडेकरांचा संजय राऊतांवर हल्लाबोल