Abhijit Bhichkule | साताऱ्यात उदयनराजेंविरोधात अभिजीत बिचुकले रिंगणात; उमेदवारी अर्जाबाबत म्हणाले, “मी एकटा…”

Abhijit Bhichkule | सातारा लोकसभा मतदारसंघातून अखेर महायुतीने उमेदवार दिला आहे. साताऱ्यातून भाजपाने पुन्हा एकदा उदयनराजे भोसले यांना लोकसभेची उमेदवारी जाहीर झाली आहे. त्यामुळे साताऱ्यात उदयनराजे भोसले आणि महाविकास आघाडीचे उमेदवार शशिकांत शिंदे यांच्यात दुरंगी लढत पहायला मिळण्याची शक्यता होती. परंतु, या जागेवरून आता बिग बॉस फेम अभिजीत बिचुकलेही उतरणार आहेत. १९ एप्रिल रोजी ते उमेदवारीचा अर्ज भरणार असल्याचं त्यांनी म्हटलंय. माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी ही माहिती दिली.

अभिजीत बिचुकले (Abhijit Bhichkule) म्हणाले, “मी एकच गोष्ट सांगतो की मी १९ तारखेला अर्ज भरणारच. भाजपाकडून तिकीट मिळावं अशी उदयनराजेंची इच्छा होती. ती इच्छा पूर्ण झाली. पण भाजपावाल्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना किती मान दिलाय याचं आत्मपरिक्षण उदयनराजेंनी केलं पाहिजे. त्यानंतर लोकांनी त्यांचं आत्मपरिक्षण केलं पाहिजे. शक्तीप्रदर्शन काय असतं? शक्ती लोकांनी युद्धात दाखवली पाहिजे. मटण देऊन शक्ती दाखवली जात नाही.”

“शरद पवार आणि उदयनराजेंचं हाडवैर आहे. मी या सगळ्यांमध्ये एकटा लढतोय त्यामुळे यावेळी मला संधी द्या”, असंही अभिजीत बिचुकले यावेळी म्हणाले.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

Ajit Pawar | भावनिक न होता देशाच्या भवितव्यासाठी महायुतीला मतदान करा; माजी सैनिकांच्या मेळाव्यात अजित पवारांचे आवाहन

Shivajirao Adhalrao Patil | “जनतेच्या प्रेमाची कळवळ म्हणून मी राजकारणात”, आढळराव पाटलांनी व्यक्त केल्या भावना

Ravindra Dhangekar | पुण्याच्या विकासापेक्षा धंगेकरांसाठी टिका टिपण्णी महत्त्वाची; व्हिजनच्या नावानेही बोंबाबोंब