Mahavikas Aghadi | महाविकास आघाडीचे तीनही उमेदवार एकाच वेळी अर्ज भरणार; पुण्यात होणार शक्तिप्रदर्शन

महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi) उमेदवार बारामती लोकसभा मतदारसंघाच्या सुप्रिया सुळे, शिरूर लोकसभा मतदारसंघाचे डॉ. अमोल कोल्हे व पुणे लोकसभा मतदारसंघाचे रवींद्र धंगेकर हे तीनही उमेदवार गुरुवार दिनांक 18 एप्रिल 2024 रोजी आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार असून यावेळी महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) वतीने भव्य शक्ती प्रदर्शन करण्यात येणार आहे.

दिनांक 18 एप्रिल 2024 रोजी सकाळी साडेदहा वाजता विभागीय आयुक्त कार्यालय तथा जिल्हाधिकारी कार्यालय येथे सुप्रिया सुळे, डॉ.अमोल कोल्हे, रविंद्र धंगेकर हे महाविकास आघाडीचे तीनही उमेदवार आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. यानंतर रास्ता पेठेतील हॉटेल शांताई समोर महाविकास आघाडीची भव्य सभा होणार असून राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्र पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खा. संजय राऊत, काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात, आम आदमी पार्टीचे प्रदेशाध्यक्ष अजित फटके हे दिग्गज नेते पुण्यातून निवडणुकीचे रणशिंग फुंकणार आहेत.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

Ajit Pawar | भावनिक न होता देशाच्या भवितव्यासाठी महायुतीला मतदान करा; माजी सैनिकांच्या मेळाव्यात अजित पवारांचे आवाहन

Shivajirao Adhalrao Patil | “जनतेच्या प्रेमाची कळवळ म्हणून मी राजकारणात”, आढळराव पाटलांनी व्यक्त केल्या भावना

Ravindra Dhangekar | पुण्याच्या विकासापेक्षा धंगेकरांसाठी टिका टिपण्णी महत्त्वाची; व्हिजनच्या नावानेही बोंबाबोंब