Shivajirao Adhalrao Patil | “जनतेच्या प्रेमाची कळवळ म्हणून मी राजकारणात”, आढळराव पाटलांनी व्यक्त केल्या भावना

Shivajirao Adhalrao Patil | खेड व नंतर शिरूर लोकसभा मतदारसंघात तीनवेळा जनतेच्या प्रेमामुळे खासदारकीची संधी मिळाली. या १५ वर्षांच्या काळात जनतेचे प्रश्न लोकसभेत सोडविण्यासाठी वेळ दिला. मतदारसंघात वाड्या-वस्त्यांवर जाऊन जनसंपर्क ठेऊन जनतेची कामे केलीत. स्वत: उद्योजक असल्याने अमेरिकेत राहून व्यवसाय बघत आयुष्य व्यतीत करू शकलो. परंतु जनतेच्या प्रेमाची कळवळ म्हणून मी राजकारण करीत राहिलो. असे विधान शिरूर लोकसभेचे महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील (Shivajirao Adhalrao Patil) यांनी केले.

आढळरावांना महायुतीकडून शिरूर लोकसभेची उमेदवारी देण्यात आली आहे. त्याच अनुषंगाने त्यांनी आपला प्रचार करण्यास सुरूवात केलीय. यातच पुढे बोलतांना ते म्हणाले की, मोदी सरकारच्या पहिल्या टर्ममध्ये पुणे-नाशिक रस्ता, पुणे-नाशिक हायस्पीड रेल्वे आदी कामे मी दृष्टीपथात ठेवली होती. मात्र ५ वर्षात काय झाले हे जनतेने अनुभवले आहे. शेतकरी, कामगार, असंघटीत कामगार,, बेरोजगारी, उद्योग व्यवसायासंदर्भात विक्रमी प्रश्न संसेदत मांडले.मतदारसंघात भरीव निधी आणला. अशावेळी मागील पाच वर्षात काय काम झाले ? असा सवाल करत त्यांनी अमोल कोल्हे यांच्यावर हल्लाबोल केला.

तर फक्त आवेशात संसदेत भाषणे करायची, भाषणांची मोदींना भुरळ पडल्याचे सांगायचे. राष्ट्रवादीशी एकनिष्ठता सांगता आणि मग शपथविधीला अजित पवार यांच्यासोबत जाता तसेच खासदारकी मिळण्यासाठी भाजपला पाच वर्षे डोळे कोण मारत होते. अशी टिकाही शिवाजीराव आढळराव पाटील यांनी विद्यमान खासदार अमोल कोल्हे यांच्यावर यावेळी केली.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

Mohite Patil | “मोहिते पाटील स्वार्थी, त्यांना विनाशकाले विपरीत बुद्धी सुचली”, अजितदादांच्या नेत्याची जहरी टीका

Sharad Pawar : शरद पवारांची सारवासारव; सुनेत्रा पवारांच्या बाबत केलेल्या वक्तव्याबाबत म्हणाले…

Sunetra Pawar | रखरखत्या उन्हातही सुनेत्रा वहिनींच्या प्रचाराला मतदारांचा मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद, धायरीत जंगी स्वागत