महिलांचे अधिकार वाढले तर त्यांची भूमिका निर्णायक ठरेल, शरद पवार यांचे वक्तव्य

Sharad Pawar: आज महिला प्रत्येक क्षेत्रात पुढे आहेत. कर्तृत्वावर घर चालवण्यात महिला आघाडीवर आहेत. आमच्या काळात आम्ही महिलांना ४० टक्के आरक्षण दिलं. पतीच्या संपत्तीत ५० टक्के वाटा महिलांचा असला पाहिजे अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी सोलापूर जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला कार्यकर्ते मेळाव्यात बोलताना म्हटले आहे.

शरद पवार म्हणाले की, मी राज्याचा मुख्यमंत्री असताना देशाचे माजी पंतप्रधान स्वर्गीय राजीव गांधी यांना घेऊन या भागांमध्ये आलो होतो. त्यावेळी या भागातील अनेक महत्वाच्या प्रश्नांची सोडवणूक झाली होती. या गोष्टीची आठवण अनेक जुन्या लोकांना आजही आहे. आज सुनिता ताईने या ठिकाणी मेळावा आयोजित केला त्याच्या पाठीमागे या भागाचे प्रश्न जे आहे. विजेचा दराचा प्रश्न, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न असेल याच्याकडे आजच्या सरकारचं आणि महापालिकेचे लक्ष नाही. ते लक्ष न देण्याची त्यांची भूमिका ही बदलण्याच्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने प्रयत्नाची पराकाष्टा करावी आणि तुम्हा लोकांच्या जीवनामध्ये समस्या सोडण्याचा दिवस यावा ही सुनिता ताईंच उद्दिष्ट होतं असे शरद पवार म्हणाले.

शिवाजी मानकर

शरद पवार म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महिलांच्या अधिकाराबदल त्यांच्या समस्या बद्दल अतिशय गांभीर्याने लक्ष देणारा पक्ष आहे. हातामध्ये सत्ता होती त्यावेळी आम्ही अनेक गोष्टीची सुरुवात केली. महिलांना नगरपरिषद, पंचायत समिती, जिल्हा परिषद, अन्य संस्थांमध्ये त्या ठिकाणी काम करण्याची संधी देण्यासाठी महिलांना आरक्षण देण्याची भूमिका त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसने घेतली होती. देशात पहिल्यांदा महिलांना नगरपालिका, पंचायत समिती, जिल्हा परिषद आणि सरकारी संस्था या सर्वांमध्ये आरक्षण दिलं त्याचा परिणाम आपण गेल्या अनेक वर्षांपासून पाहत आहोत की महिला निवडून आल्या आहे. उत्तमरीत्या कारभार चालवत आहे असे शरद पवार म्हणाले.

पुढे शरद पवार म्हणाले की, आम्ही जेव्हा निर्णय घेतला, त्यावेळेस महिलांमध्ये जागृती झाली. त्यामुळे आज महिलांचे राज्य आले आहे. घर चालवण्यात महिला आघाडीवर आहेत. पहिल्यांदा महिलांसाठी अनेक दारे खुली केली. त्यांना ४० टक्के आरक्षण दिलं. पतीच्या संपत्तीत ५० टक्के वाटा महिलांचा असला पाहिजे. घरात मालकी दोघांची असली पाहिजे. पती जर रुबाब करत असेल तर तुम्हाला सांगावे लागेल. घर तुझं एकट्याचा नाही, माझंही घर आहे, असा सला शरद पवार यांनी महिलांना दिला. कुटुंबामध्ये मुलांवर संस्कार करण्याचे काम महिला करत असल्याचेही शरद पवारनी सांगितले.

शरद पवार म्हणाले की, देशांमध्ये १९९३ मध्ये राज्य महिला आयोग स्थापन करणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य होते. मी मुख्यमंत्री असताना जून १९९३ साली महिला आयोग स्थापन करून महिलांसाठी स्वतंत्र विभाग सुरू केला. महिलांना आरक्षण देण्याचे काम देखील आम्ही केले. देशात पहिले महिला धोरण जाहीर झाले त्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये ३३ टक्के आरक्षण दिले हे आरक्षण देणार महाराष्ट्र पाहिलं राज्य होतं. मी संरक्षण विभागात असताना तिन्ही दलात महिलांसाठी ११ टक्के जागा राखीव ठेवल्या असेही शरद पवार म्हणाले.

पवार म्हणाले की, जेव्हा माझ्याकडे देशाचे संरक्षण खाते होते तेव्हा २२ जुन १९९४ ला देशात पहिलं महिला धोरण जाहीर केले होते. यामध्ये सरकारी, निमसरकारी महिलांसाठी सोयी-सुविधा कशा पुरवल्या जातील याचा विचार केल्या गेला. तर संरक्षण खातं होत तेव्हा तिन्ही दलात महिलांसाठी ११ टक्के आरक्षण महिलांना जाहीर केले होते. यासोबतच दिल्ली येथील प्रजाकसत्ताक दिनाच्या परेडचे नेतृत्व एक भगिनी करते हे आपण पाहतो. एअर फोर्समध्ये महिलांना सहभागी करून घेण्याचा निर्णय कॉंग्रेसने घेतला होता. तर संरक्षण मंत्री असताना प्रत्येक बैठकीत मी महिलांना या तीनही दलात घ्या असे मी म्हणत होतो पण मान्य करीत नव्हे पंरतू मी हा निर्णय घेतला आणि चर्चाच बंद करून टाकली असे शरद पवार म्हणाले.

शरद पवार म्हणाले की, स्त्रियांचे अधिकार वाढले पाहिजेत. महिलांचे अधिकार वाढले तर त्यांची भूमिका निर्णायक ठरेलं. सावित्रीबाई यांच्यावर दगडधोंडे मारले होते. अशा अनेक स्त्रिया आहेत. यांच्यात अहिल्याबाई होळकर असतील, इंदिरा गांधी यांचे नाव घेता येईल. महिला पन्नास टक्के असतील त्यावेळेस त्या राज्याचा विकास होईल. ५०% भगिनी शिक्षण संस्था चालू शकतात. त्यामुळे प्रशासनाची गुणवत्ता वाढल्याशिवाय राहणार नाही. महिलासाठी राष्ट्रवादी काँग्रेस काम करत आहे. सामाजिक स्थर बदलण्यासाठी महिला उपयुक्त ठरतील. एकत्र येण्याचे काम केले तर अन्यायही दूर करूया, असंही शरद पवार यांनी आवाहन केलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

मंदिर नको तर रोटी, कपडा, मकान, शिक्षण आणि आरोग्य हवंय; नक्षलवाद्यांची कोल्हेकुई झाली सुरु

Ram Mandir Pran Pratishta : राम मंदिरातील प्राणप्रतिष्ठा सोहळा थांबवला जाणार?

Women’s Health: 50 व्या वर्षी निरोगी राहू इच्छिता? रोज ही एक गोष्ट खायला सुरुवात करा