PFI : पाच ‘पीएफआय’ सदस्यांविरुद्ध विशेष न्यायालयात आरोपपत्र

Mumbai – महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने अर्थात ए टी एस ने, पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया या संघटनेच्या पाच आरोपींवर काल मुंबई सत्र न्यायालयात आरोपपत्र दाखल केलं. देशात दहशतवादी कारवाया करण्याच्या आरोपावरून एटीएसनं गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात कारवाई करत 21 जणांना ताब्यात घेतलं होतं.(PFI: Charge sheet against five ‘PFI’ members in special court).

या प्रकरणी मुंबईसह नाशिक, औरंगाबाद आणि नांदेड इथल्या पथकांनी कारवाई करत प्राथमिक माहिती अहवाल अर्थात एफ आय आर नोंदवले होते. त्यापैकी मुंबई पथकाने काल, विशेष न्यायाधीश ए. एम. पाटील यांच्या उपस्थितीत आरोपपत्र दाखल केलं.