Dharashiv LokSabha 2024 | “शिवसेना फोडण्याचं पाप ओमराजेंनी केलंय, कामापेक्षा भोंगा जास्त”, वंचितच्या आंधळकरांची जहरी टिका

धाराशिव | आगामी लोकसभा निवडणुकीसाठी धाराशिव लोकसभा (Dharashiv LokSabha 2024) मतदारसंघात तिरंगी लढत अटळ झाली आहे. महाविकास आघाडीकडून विद्यमान खासदार ओमराजे निंबाळकर (Omraj Nimbalkar) यांना पुन्हा उमेदवारी देण्यात आली आहे. तर दुसऱ्या बाजूला महायुतीकडून अर्चना पाटील निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या आहेत. मात्र या दोन्ही उमेदवारांमध्ये चुरशीची लढत होत असताना वंचितकडून भाऊसाहेब आंधळकर यांना उमेदवारी दिल्याने याठिकाणी तिन्ही उमेदवारांमध्ये जोरदार टक्कर बघायला मिळणार आहे. अशातच आता भाऊसाहेब आंधळकर यांनी ओमराजे निंबाळकर यांच्यावर सडकून टिका केली आहे. तर शिवसेना फोडण्याचं पाप देखील ओमराजे निंबाळकर यांनी केल्याचा आरोप त्यांनी लावला आहे.

यातच ‘ज्या तरूणांनी माझी सेल्फी काढली आहे. तेवढं तरी मतदान पडलं तरी निवडून येईल’. या विधानावर भाऊसाहेब आंधळकर यांनी ओमराजे निंबाळकर यांच्यावर जोरदार घणाघात केला. ते म्हणाले की, सेल्फी काढून सेल्फी काढली म्हणजे तुला मतदान होणार असं काही नाही. असं असेल तर आपल्या मतदारसंघात लाखो हजारो सेल्फी माझ्या आहेत. मात्र कामापेक्षा भोंगा जास्त अशा पद्धतीने ओमराजे निंबाळकर यांचा कारभार चाललं आहे. काम करायची नाही फक्त फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून हे केलं ते केलं सांगतो आहे.

आपल्या मतदारसंघातील (Dharashiv LokSabha 2024) प्रत्येक समाज, प्रत्येक व्यक्तीचा प्रश्न सोडवण्याचं काम आम्ही करत आलो आहे. नुसतं सेल्फी काढून इथं गेलो, तिथं गेलो असं चालणार नाही. आपल्या मतदारसंघातील जनता सुज्ञ आहे. त्यामुळे ओमराजे निंबाळकर यांना प्रत्युत्तर दिल्याशिवाय राहणार नाही. असा इशारा देखील भाऊसाहेब आंधळकर यांनी निंबाळकर यांना दिला आहे.

पोलिस खात्यात धडाकेबाज कामगिरी केल्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. गेल्या ११ वर्षांत खुप काम केलं आहे. कोरोना सारख्या महामारित देखील आमच्यासारखं काम कुणीही केलं नाही. मात्र मतदारसंघात काम करत असतांना ओमराजे निंबाळकर यांनीच काम करू दिलं नाही. त्यांनीच वरिष्ठांकडू चहाड्या केल्यात.गेल्या काही घटनांवरून असं लक्षात येतं की, जनता राजकीय नेत्यांसोबत राहिलेले नाहीत. त्यामुळे जो काम करेल त्याच्यासोबत जनता राहणार आहे. असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केलाय.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

Mohite Patil | “मोहिते पाटील स्वार्थी, त्यांना विनाशकाले विपरीत बुद्धी सुचली”, अजितदादांच्या नेत्याची जहरी टीका

Sharad Pawar : शरद पवारांची सारवासारव; सुनेत्रा पवारांच्या बाबत केलेल्या वक्तव्याबाबत म्हणाले…

Sunetra Pawar | रखरखत्या उन्हातही सुनेत्रा वहिनींच्या प्रचाराला मतदारांचा मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद, धायरीत जंगी स्वागत