Sharad Mohol : शरद मोहोळ प्रकरणात अटकेत असणारा विठ्ठल शेलार नेमका कोण आहे?

Vitthal Shelar : पुणे येथील कुख्यात गुंड शरद मोहोळ (Sharad Mohol) याची 5 जानेवारी 2024 रोजी त्याच्या लग्नाच्या वाढदिवशीच गोळ्या घालून हत्या झाली. या हत्या प्रकरणात पोलीस तपासातून नवीन महिती समोर येत आहे. यानुसार मुळशी तालुक्यामधीलच गुंड विठ्ठल शेलार हा या प्रकरणाचा सूत्रधार आहे असं सांगितले जात आहे.

विठ्ठल शेलार कोण आहे ?

विठ्ठल शेलार हा मुळचा मुळशी तालुक्यातील रहिवासी आहे. त्याच्यावर खून, खूनाचा प्रयत्न, अपहरण आणि खंडणीचे अनेक गुन्हे दाखल आहेत. 2014 मध्ये त्याच्यावर मोक्काअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. तसेच त्याला अटकही झाली होती. 2017 मध्ये त्याची जामीनावर सुटका करण्यात आली होती. त्यानंतर काहीच दिवसांत त्याने भाजपात प्रवेश केला. भाजपाने विठ्ठल शेलारवर मुळशी, मावळ आणि भोर तालुक्यांची जबाबदारी सोपवली होती.

महत्वाच्या बातम्या-

New EV Policy: आता होणार खरा धमाका; भारतासाठी टेस्लाचा 30 अब्ज डॉलर्सचा मेगा प्लान

‘मी मृतदेह पिशवीत नेला, पण मी मुलाची हत्या केली नाही’, सूचना सेठचा दावा

संजय राऊतांची 3 इंद्रिये निकामी झाले आहेत; अमोल मिटकरी यांची खोचक टीका