गौतमी पाटीलवर सातारा कोर्टाकडून गुन्हा दाखल करण्याचे आदेश, पण कारण काय?

सातारा- लावणी डान्सर गौतमी पाटील (Gautami Patil) ही सध्या संपूर्ण महाराष्ट्रात चर्चेत आहे. लावणीच्या नावाखाली अश्लील डान्स करणाऱ्या गौतमीवर आतापर्यंत अनेक स्थरातून टिका झाली आहे. मात्र लावणीची आवड असणाऱ्या लोकांमध्ये गौतमी पाटील म्हणजे लोकप्रिय चेहरा आहे. नाक मुरडतच का होईना लोक गौतमी पाटीलची ओळख सांगताना दिसतात. नेहमीच कोणत्या-ना-कोणत्या कारणामुळे चर्चेत राहणाऱ्या गौतमी पाटीलच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. गौतमी पाटीलवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश सातारा कोर्टाने (Satara Court) दिले आहेत.

गौतमी पाटील अश्लील डान्स करत असल्याचा आरोप अनेकांनी केला आहे. प्रतिभा शेलार यांनी गौतमी पाटील हीच्या विरोधात तक्रार दाखल केल्यानंतर सातारा कोर्टाने तिच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. तिच्या अनेक कार्यक्रमांमध्ये प्रेक्षकांनी हैदोस घातला. त्यामुळे तिच्यावर टीका करण्यात आली होती.

गौतमी आपल्या कार्यक्रमात अश्लिल हावभाव करते, लोकांना घाणारडे हातवारे करते, शॉर्ट कपडे घालते हे असले प्रकार लोककलेत व लावणीत येतच नाहीत. लावणीकडे बघण्याचा महिलांचा दृष्टीकोन बदलत असताना गौतमीने लावणीची संस्कृती जपावी. तिने लावणीच करावी अश्लीलपणा करू नये असं म्हणत तिच्यावर टीका करण्यात आली होती.