सहा महिन्यांपासून संघाबाहेर तरीही रिषभ पंत वाचवतोय भारताची लाज, काय केलाय कारनामा?

ICC Test Ranking : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने आपली ताजी कसोटी क्रमवारी जाहीर केली आहे. ज्यामध्ये इंग्लंडचा फलंदाज जो रूट (Joe Root) आता 887 रेटिंग गुणांसह अव्वल स्थानावर आला आहे. पहिल्या क्रमांकावर असलेला मार्नस लबुशेन तिसऱ्या क्रमांकावर घसरला आहे. विशेष बाब म्हणजे रिषभ पंत (Rishabh Pant) अजूनही टॉप 10 मध्ये सामील आहे, त्याला क्रिकेटच्या मैदानापासून दूर होऊन 6 महिन्यांहून अधिक काळ झाला आहे.

केन विल्यमसन 883 रेटिंग गुणांसह आयसीसी क्रमवारीतील टॉप 10 यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. ऑस्ट्रेलियाचा स्टार फलंदाज ट्रॅव्हिस हेड 873 गुणांसह चौथ्या स्थानावर कायम आहे. आयसीसी क्रमवारीत अव्वल 10 यादीत भारतीय खेळाडू म्हणून फक्त यष्टीरक्षक ऋषभ पंत आहे. पंत 758 रेटिंग गुणांसह 10 व्या क्रमांकावर आहे.

ऋषभ पंतला जवळपास 7 महिने झाले आहेत, तो क्रिकेटपासून पूर्णपणे दूर आहे. 30 डिसेंबरला सकाळी पंतचा कार अपघात झाला, त्यात ते जखमी झाला होता. WTC फायनलमध्ये टीम इंडियाला त्याची खूप उणीव  भासली. तो एनसीएमध्ये पुनर्वसन करत आहे आणि मैदानावर परत येण्यास उत्सुक आहे.