अभिनेत्री साई पल्लवी लवकरच विवाहबंधनात अडकणार

बंगरूळ –  अभिनेत्री साई पल्लवी (Actress Sai Pallavi marriage ) लवकरच विवाहबंधनात अडकणार असल्याचे समोर येत आहे. समोर येत असलेल्या वृत्तानुसार, अभिनेत्री साई पल्लवीच्या लग्नासाठी तिच्या पालकांनी तयारी केली आहे. त्यामुळे अभिनेत्रीच्या पालकांनी परफेक्ट वराचा ( Sai Pallavi husband) शोध सुरू केला आहे. अभिनेत्रीचा आगामी चित्रपट वीरता पर्वम (Veerata Parvam) प्रदर्शित झाल्यानंतरच तिचे हात पिवळे होऊ शकतात असा दावा केला जात आहे.

अभिनेत्री साई पल्लवी ही मेडिकलची विद्यार्थिनी आहे. वैद्यकीय शिक्षण पूर्ण करून ती फिल्मी दुनियेत आली. जिथे या अभिनेत्रीने अल्पावधीतच अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम करून आपली क्षमता सिद्ध केली आहे. सई पल्लवी तिच्या साध्या लुक आणि दमदार अभिनयामुळे लोकांच्या मनावर राज्य करत आहे.

अभिनेत्रीचा मागील रिलीज झालेला चित्रपट नागा चैतन्य स्टारर लव्ह स्टोरी होता. जो सुपरहिट ठरला. अशा परिस्थितीत अभिनेत्रीच्या लग्नाची बातमी तिच्या चाहत्यांना 440 व्होल्टचा धक्का देऊ शकते. त्यामुळे अभिनेत्रीच्या लग्नाबद्दल तुम्ही उत्सुक आहात का? तुमचे मत कमेंट करून आम्हाला कळवा.