अयोध्यामध्ये आम्ही राजकारण करण्यासाठी आलो नाही तर तिर्थयात्रेसाठी आलो आहोत – आदित्य ठाकरे

अयोध्या – राज्याचे पर्यावरण मंत्री आणि शिवसेना नेते आदित्य ठाकरे (Environment Minister and Shiv Sena leader Aditya Thackeray) आज अयोध्या (Ayodhya) दौऱ्यावर आहेत. आदित्य ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्यासाठी राज्यातूनही हजारो शिवसैनिक अयोध्येत दाखल (Shiv Sainik arrives in Ayodhya) झाले आहेत. मनसे प्रमुख राज ठाकरे (MNS chief Raj Thackeray) यांनी अयोध्या दौरा रद्द केल्यानंतर आदित्य ठाकरे यांचा हा दौरा होत आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळाचे या दौऱ्याकडे लक्ष लागले आहे.

दरम्यान, अयोध्यामध्ये आम्ही राजकारण करण्यासाठी आलो नाही तर तिर्थयात्रेसाठी आलो आहोत. या ठिकाणी राजकीय विषय काढणं उचित नसेल. आमचं हिंदुत्व (Hindutva) स्पष्ट आहे, त्यामुळे अयोध्येला आम्ही राजकारणासाठी आलो नाही तर तिर्थयात्रेसाठी आलो आहोत असं राज्याचे मंत्री आदित्य ठाकरे म्हणाले.

अयोध्यात महाराष्ट्र सदन बांधणार असल्याचं ते म्हणाले. तसेच मुंबई महापालिकेमध्ये रामराज्य येणार (Ram Rajya will come in Mumbai Municipal Corporation) असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. दोन वर्षांनंतर अयोध्या दौऱ्यावर आलो आहे, उत्साह तोच आहे. माझ्यासोबत सर्व शिवसैनिक आले आहेत. इथे आम्ही राजकारण करायला आलो नाही, आम्ही तिर्थयात्रेला आलो आहोत असं आदित्य ठाकरे म्हणाले.