अखेर आफताबने ‘असा’ टॅटू का काढला होता ? पोलीसही हैराण 

नवी दिल्ली –  श्रद्धा खून  प्रकरणात दर तासाला खळबळजनक खुलासे होत आहेत. एकीकडे पोलीस हैराण आहेत तर दुसरीकडे सर्वसामान्य जनता दहशतीत आहे. आफताब अमीन पूनावाला सारखा कलियुगी हैवान, अगदी तुमच्या-आमच्यासारखा दिसतो पण त्याचे भयंकर हेतू जाणून जल्लादलाही धक्का बसेल.

टाईम्स नाऊ नवभारतच्या वृत्तानुसार  या मारेकऱ्याच्या मनात नेमके काय चालले होते, याचा सखोल तपास सुरू आहे. आफताबबाबत एकामागून एक अनेक मोठे खुलासे होत आहेत. आफताबच्या 20 पेक्षा जास्त गर्लफ्रेंड होत्या. डेटिंग अॅपद्वारे महिलांशी संपर्क साधायचा. दिल्ली ते महाराष्ट्रात 20 हून अधिक मुलींशी त्याचा संपर्क होता. मुलींशी संपर्क साधण्यासाठी तो वेगवेगळ्या सिमचा वापर करत असे.

दरम्यान, आफताबने 8 वर्षांपूर्वी हातावर टॅटू बनवला होता. या टॅटूमध्ये दोन शब्द आहेत… trust and hope म्हणजे विश्वास आणि आशा पण आता या टॅटूचा अर्थ काय आणि त्याचा श्रद्धा खून प्रकरणाशी काही संबंध आहे का हे कोडेच बनले आहे. अखेर आफताबने असा टॅटू का काढला आणि आफताबने यापूर्वी काही गुन्हा केला होता का. अनेक प्रश्न आहेत… पोलिसांना भरपूर पुरावे मिळण्याची प्रतीक्षा आहे.

श्रध्दा हत्येचे गूढ दिवसेंदिवस नवनवीन खुलासे होत आहे. जल्लाद आफताब दिल्ली पोलिसांची दिशाभूल करत आहे. दिल्ली पोलिसांना आजपर्यंत श्रद्धाचे छिन्नविछिन्न शीर परत मिळवता आलेले नाही. पण आता काय उघड झाले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्या खोलीत श्रद्धाच्या मृतदेहाचे अवयव फ्रीजमध्ये ठेवण्यात आले होते त्याच खोलीत आफताब सलग 18 दिवस झोपला होता. एवढेच नाही तर तो रोज फ्रिज उघडून श्रद्धाचे कापलेले डोके पाहत असे.