हत्येच्या वेळी श्रद्धा गरोदर होती ? दर तासाला  होत आहेत खळबळजनक खुलासे

नवी दिल्ली –  श्रद्धा  वालकर खून  प्रकरणात दर तासाला खळबळजनक खुलासे होत आहेत. एकीकडे पोलीस हैराण आहेत तर दुसरीकडे सर्वसामान्य जनता दहशतीत आहे.   आफताब अमीन पूनावाला सारखा कलियुगी हैवान, अगदी तुमच्या-आमच्यासारखा दिसतो पण त्याचे भयंकर हेतू जाणून जल्लादलाही धक्का बसेल. श्रद्धा हत्याकांडात आता नवे खुलासे झाले आहेत. हत्येच्या वेळी श्रद्धा आई होणार होती का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. हत्येच्या वेळी श्रद्धा गरोदर होती, असे पोलिसांना तपासात निष्पन्न झाले आहे. तथापि, शरीराचे अवयव पुनर्प्राप्त न झाल्यामुळे, अद्याप अधिकृतपणे याची पुष्टी होऊ शकली नाही.

टाईम्स नाऊ नवभारतच्या वृत्तानुसार  या मारेकऱ्याच्या मनात नेमके काय चालले होते, याचा सखोल तपास सुरू आहे. आफताबबाबत एकामागून एक अनेक मोठे खुलासे होत आहेत. आफताबच्या 20 पेक्षा जास्त गर्लफ्रेंड होत्या. डेटिंग अॅपद्वारे महिलांशी संपर्क साधायचा. दिल्ली ते महाराष्ट्रात 20 हून अधिक मुलींशी त्याचा संपर्क होता. मुलींशी संपर्क साधण्यासाठी तो वेगवेगळ्या सिमचा वापर करत असे.

श्रध्दा हत्येचे गूढ दिवसेंदिवस नवनवीन खुलासे होत आहे. जल्लाद आफताब दिल्ली पोलिसांची दिशाभूल करत आहे. दिल्ली पोलिसांना आजपर्यंत श्रद्धाचे छिन्नविछिन्न शीर परत मिळवता आलेले नाही. पण आता काय उघड झाले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्या खोलीत श्रद्धाच्या मृतदेहाचे अवयव फ्रीजमध्ये ठेवण्यात आले होते त्याच खोलीत आफताब सलग 18 दिवस झोपला होता. एवढेच नाही तर तो रोज फ्रिज उघडून श्रद्धाचे कापलेले डोके पाहत असे.