भारतमातेच्या शूर सुपुत्रांना मी अभिवादन करतो; हेलिकॉप्टर अपघातानंतर धर्मेंद्र झाले भावूक

नवी दिल्ली : देशाने 8 डिसेंबरला असा अपघात पाहिला, ज्याने सर्वांनाच हादरवून सोडले. तामिळनाडूच्या कुन्नूर भागात हवाई दलाचे हेलिकॉप्टर क्रॅश झाले, ज्यामध्ये सीडीएस जनरल बिपिन रावत, त्यांची पत्नी मधुलिका रावत आणि इतर लष्करी अधिकाऱ्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पार्थिवावर शुक्रवारी अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेने ८६ वर्षीय ज्येष्ठ कलाकार धर्मेंद्र यांनाही हादरवून सोडले आहे. धर्मेंद्र यांनी एक व्हिडिओ पोस्ट करून एक भावनिक संदेश लिहिला आहे.

धर्मेंद्र यांनी लिहिले – हृदयद्रावक बातमी. भारतमातेच्या शूर सुपुत्रांना मी अश्रूंनी अभिवादन करतो. धर्मेंद्र यांनी एका वृत्तवाहिनीचा एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये लष्करी अधिका-यांचे मृतदेह दाखवण्यात आले आहेत.  धर्मेंद्र यांनी 8 डिसेंबर रोजी त्यांचा 86 वा वाढदिवस साजरा केला. तसे, धर्मेंद्र यांनी स्वतः अनेक चित्रपटांमध्ये लष्करी अधिकाऱ्यांचि भूमिका साकारली आहे.