‘कोणत्या मायमाउलीकडून तू कंबरेपर्यंत पाय दाबून घेतले, माझ्याकडे पुरावे’, अजय बारसकर यांचे जरांगेंवर पुन्हा गंभीर आरोप

Manoj Jarage Patil – Ajay Maharaj Baraskar: अजय महाराज बारसकर यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्यावर काही दिवसांपूर्वी गंभीर आरोप केले होते. त्यानंतर मराठा आंदोलक आक्रमक झाले असून त्यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्नही झाला. अशातच आता अजय बारसकर पुन्हा एकदा माध्यमांसमोर आले आहेत. यावेळीही त्यांनी जरांगेंवर गंभीर आरोप केले.

“मनोज जरांगे यांच्यापासून आंदोलन सुरु होतं आणि त्यांच्यापासून संपतो. तोच मेन नेता आहे. दुसरा-तिसरा प्रवक्त तुम्ही पाहिला का? जरांगे पाटील यांच्या वतीने कुठला वकील, अभ्यासक पाहिला का? जरांगे पाटील यांच्या तोंडून कुणाचं नाव ऐकलं का? टीमवर्कचा पत्ताच नाही. दिवसाला तत्वज्ञान बदलत आहे. माझी मागणी आहे की, मी बलात्कार केल्याचा आरोप जरांगेंनी केला. मी विनयभंग केला असेल तर त्या महिला समोर आणून दाखव”, असं आव्हान बारसकर यांनी मनोज जरांगे यांना दिलं आहे.

“मी तुला कसले प्रश्न विचारले? मी त्याला वैयक्तिक प्रश्न विचारले का? मागे 17 दिवसांचं आंदोलन झालं तेव्हा तू रात्री कुणाच्या घरात दूध-भात खात होता? माझ्याकडे रेकॉर्ड नाही का? माझ्याकडे पुरावे नाहीत? कोणत्या मायमाउलीकडून तू कंबरेपर्यंत पाय दाबून घेतले, माझ्याकडे पुरावे नाहीत? माझ्याकडे व्हिडीओ आणि रेकॉर्डींग आहेत. कोणत्या माता-माऊलीला तू आंबडचा आमदार बनवण्याचा शब्द दिलाय? जरांगे मला माहिती आहे. पण आमची ती संस्कृती नाही. आम्ही सामाजिक प्रश्नावर आवाज उठवला. डील काय झाली ते आम्हाला माहिती आहे”, असं अजय महाराज बारसकर म्हणाले.

महत्वाच्या बातम्या-

Lok Sabha Elections 2024 | भाजप उमेदवारांची पहिली यादी आठवडाभरात येणार; जाणून घ्या कुणाचा असेल यात समावेश

अजय बारसकरवर महिलेच्या विनयभंगाच्या प्रकरणाचा दवाब आणला, सरकारने हा ट्रॅप रचला – Manoj Jarange

MNS-BJP Alliance | मनसे-भाजप युती जवळपास निश्चित, लोकसभेच्या दोन जागाही ठरल्या?