Manoj Jarange Patil महाविकास आघाडीचा प्यादा, प्रवीण दरेकरांची सडकून टीका

Pravin Darekar On Manoj Jarange Patil : ओबीसीतून आरक्षण देण्याची मागणी करताना मनोज जरांगे पाटील यांनी आक्रमक पवित्रा घेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर कडवट टीका केली. जरांगेंच्या फडणवीसांवरील टीकेनंतर सत्ताधारी आक्रमक झाले आहेत. अशातच भाजपचे विधान परिषदेतील गटनेते आमदार प्रवीण दरेकर (Pravin Darekar) यांनी मनोज जरांगेंना (Manoj Jarange Patil) महाविकास आघाडीचा प्यादा म्हटले आहे.

प्रवीण दरेकर म्हणाले की, आज भाजपची बैठक झाली. या बैठकीत जरांगे जे बोलत आहेत त्यावर भूमिका मांडली. देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल एकही शब्द यापुढे ऐकून घेणार नाही. रोहित पवार, राजेश टोपे, शरद पवार हे मराठा आरक्षण (Maratha Reservation) मिळाल्यानंतर देखील आंदोलनाला बळ देण्याचा प्रयत्न करत आहेत, असा गंभीर आरोप प्रवीण दरेकर यांनी केला आहे.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

…तर खपवून घेतले जाणार नाही
उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री असताना ते आरक्षण देऊ शकले नाही. मराठा समाजाच्या भावना समजून 10 टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आला. जरांगे म्हणजे मराठा समाज नाही. भाजपचे नेतृत्व देवेंद्र फडणवीस आहेत. त्यांच्यावर टीका करत असाल तर खपवून घेतले जाणार नाही, असा इशारा त्यांनी यावेळी दिला आहे.

मनोज जरांगे मविआचं प्यादं
आंदोलन करण्याचा अधिकार आहे. मात्र प्रसिद्धीची नशा काहींना चढली आहे. त्यातून हे फ्रस्ट्रेशन आहे. विषय संपल्यावर परत का? तो विषय काढला. मनोज जरांगे हा महाविकास आघाडीचा प्यादा आहे, अशी टीकाही प्रवीण दरेकर यांनी केली आहे.

महत्वाच्या बातम्या : 

‘एकच मिशन, पुणे नंबर वन’ हा संकल्प घेऊन पुण्यासाठी कार्यरत राहणार – Shivaji Mankar

जास्तीत जास्त युवक-युवतींना मेळाव्यातून रोजगार मिळण्यासाठी रोजगार इच्छूकांची नोंदणी वाढवावी, उपमुख्यमंत्री पवारांचे आवाहन

जनतेला लिहिलेल्या खुल्या पत्रात पवार साहेबांचं नाव लिहिण्याचे धाडस दादांमध्ये नाही