कोणतेही गरीब कुटुंब उपाशी झोपता कामा नये, गरीबातल्या गरीब कुटुंबापर्यंत रेशनचे धान्य पोहोचवा; छगन भुजबळ यांचे अधिकाऱ्यांना निर्देश

Chhagan Bhujbal – गरीबातल्या गरीब कुटुंबातील प्रत्येक लाभार्थ्याला स्वस्त धान्य मिळायलाच हवे. कोणत्याही गरीब कुटुंबाची अडवणूक न करता त्यांना शिधापत्रिकादेखील लवकरात लवकर दिल्या जाव्यात असे निर्देश अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी आज दिले.

आज मुंबईतील आझाद मैदानात अखिल भारतीय जनवादी महिला संघटनेच्यावतीने रेशन दुकानाच्याबाबतीत विविध मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आले होते. मात्र मंत्री छगन भुजबळ यांनी या महिलांच्या शिष्टमंडळाची भेट घेत त्यांच्या प्रश्नांची समाधानकारक उत्तरे दिली व संबंधित अधिकाऱ्यांना ताबडतोब कार्यवाही करण्याचे निर्देश दिले.

यावेळी संघटनेच्यावतीने आलेल्या महिलांनी रास्त धान्य रेशन दुकानावर पूर्वी २ किंवा ३ रुपये किलोने मिळणारे धान्य आता मिळत नाही अशी तक्रार केली होती मात्र त्यांचा गैरसमज दूर करत सर्वत्र आपण हे धान्य मोफत वाटत आहोत अशी माहिती छगन भुजबळ यांनी दिली.

अनेक दुकानदार संपूर्ण धान्य न देता अर्धवट धान्य देऊन फसवणूक करत असल्याची तक्रार या महिलांची होती अशा दुकानदारांवर कडक कारवाई करून त्यांच्या दुकानाचा परवाना रद्द करू असा विश्वासही छगन भुजबळ यांनी शिष्टमंडळाला दिला.

स्वस्त धान्य दुकानांवर केरोसीन (रॉकेल) मिळत होते मात्र आता केरोसीन मिळत नाही ते पुन्हा पूर्ववत झाले पाहिजे अशी मागणीदेखील या महिलांनी केली होती. याला उत्तर देताना याबाबतीत कोर्टाने उज्वला गॅस योजनेच्या लाभार्थ्यांना केरोसीन देऊ नये असे निर्देश दिले होते. मात्र यासाठी सरकारची न्यायालयीन लढाई सुरू आहे. लवकरच कोर्टात आपली बाजू भक्कमपणे मांडून न्याय मिळवून देऊ असेही छगन भुजबळ यांनी सांगितले.

याशिवाय महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यात असणाऱ्या प्रश्नाबाबत छगन भुजबळ यांनी शिष्टमंडळासमोरच अधिकाऱ्यांना फोन करून लवकरात लवकर सर्व प्रश्न सोडवून. प्रत्येक लाभार्थ्याला स्वस्त धान्य मिळायलाच हवे त्यासाठी योग्य ती कारवाई करण्याचे निर्देश दिले.

या शिष्टमंडळात आमदार विनोद निकोले, संघटनेच्या प्राची हतिवलेकर, केरळच्या माजी मंत्री मरियम ढवळे, नसीमा शेख, रेखा देशपांडे, पी.के श्रीमंती यांचा समावेश होता.

https://youtu.be/RsojeTFHYGA?si=e0btub7fBGH2dCiM

महत्त्वाच्या बातम्या-

मन जिंकलंस..! नुकताच बाप बनलेल्या बुमराहला पाकिस्तानी गोलंदाज आफ्रिदीने दिली खास भेट

नाणेफेकीच्या ५ मिनिटांच्या आधी, ‘त्याला’ सांगितलं की..”, Rohit Sharmaचा ‘या’ खेळाडूविषयी मोठा खुलासा

विराट कोहलीचे ‘विक्रमतोड’ शतक, सचिन तेंडूलकरला मागे टाकत बनला जगातील पहिला फलंदाज