अजित पवार एवढे मोठे नेते नाहीत की ते शरद पवारांना ऑफर देऊ शकतील – राऊत

Sanjay Raut – शरद पवार (Sharad Pawar) सोबत आले तरच तुम्हाला मुख्यमंत्रीपद मिळेल असं भारतीय जनता पार्टीच्या पक्षश्रेष्टींकडून अजित पवारांना सांगण्यात आल्याचा दावा विरोधीपक्ष नेते विजय वड्डेटीवार (Opposition leader Vijay Vaddetiwar) यांनी केला आहे. नागपूरमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलताना वड्डेटीवार यांनी अजित पवार (Ajit Pawar) भाजपाच्या सांगण्यावरुन शरद पवारांचं मन वळवण्याचा प्रयत्न करत असल्याचंही म्हटलं आहे.

2 प्रमुख पक्ष पडूनही भाजपाची परिस्थिती सुधारत नसल्यामुळे अजित दादा हे शरद पवार यांना भेटत आहे. लोकनेतृत्व असलेले शरद पवार यांची गरज भाजपाला आहे. त्यांची मदत मिळाल्याशिवाय लोकसभेतील आकडा वाढू शकत नाही. त्यामुळे अजित दादाच्या शरद पवार यांना भेटत आहे, असं वड्डेटीवार म्हणाले.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अजित पवार यांना अट घातली आहे की शरद पवार आल्याशिवाय तुम्हाला मुख्यमंत्री होता येणार नाही. म्हणूनच अजितदादा मुख्यमंत्री होण्यासाठी शरद पवारांना वारंवार भेटून सोबत येण्यास आग्रह करत आहेत, असं वड्डेटीवार यांनी म्हटलं आहे.

याचसंदर्भात ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांना प्रश्न विचारण्यात आला असता त्यांनी शरद पवारांना ऑफर देण्याइतके अजित पवार कधी मोठे झाले? असा उलट प्रश्न विचारला आहे. ते म्हणाले, अजित पवार एवढे मोठे नेते नाहीत की ते शरद पवारांना ऑफर देऊ शकतील. अजित पवारांना शरद पवारांनी घडवलं आहे. शरद पवारांना अजित पवारांनी घडवलेलं नाही. 60 ते 70 वर्षांहून अधिक काळ पवार हे संसदीय राजकारणामध्ये आहेत. 4 वेळा राज्याचे मुख्यमंत्री आणि अनेकदा देशातील केंद्रीय मंत्रीपद त्यांनी भूषवलं आहे. त्यांची उंची फार अधिक आहे. अजित पवार, हसन मुश्रीफ यांच्यासारखे ज्युनिअर लोक पवारसाहेबांना काय ऑफर देणार? असं कधी होतं का राजकारणामध्ये? असं म्हणत उपमुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला.

केंद्रीय स्तरावरील ऑफर शरद पवारांना देण्याइतके अजित पवार कधी मोठे झाले? अजित पवार आणि शरद पवार हे नक्कीच कौटुंबिक नात्याने बांधलेले आहेत. त्यांचं कुटुंब मोठं आहे. त्यांच्या काही संस्था एकत्र आहेत. मी जे काही पवारसाहेबांना ओळखतो. ते भारतीय जनता पक्षाबरोबर त्यांच्या हयातीमध्ये हातमिळवणी करतील असं मला वाटतं नाही. ते करणार नाहीत असं काही याचा मला विश्वास आहे, असंही संजय राऊत म्हणाले.