हद्द झाली ! प. बंगालमध्ये दोन महिलांना नग्न करून बेदम मारहाण

कोलकाता – मणिपूरमधील (Manipur) व्हायरल व्हिडिओमुळे (Viral Video) संपूर्ण देशभरात संतापाची लाट उसळली आहे. तर दुसऱ्या बाजूला आणखी एक घटना प.बंगालमधून समोर आली आहे. चोर समजून दोन महिलांना नग्न करून जमावाने बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

मालदाच्या बामनगोला पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पाकुआहाट येथे ही घटना घडल्याचा भाजप नेत्यांचा दावा आहे. या ठिकाणी मंगळवारचा बाजार भरतो. या बाजारात पाकिटमारीच्या आरोपावरून दोन महिलांना पकडण्यात आलं. त्यानंतर त्यांना बेदम मारहाण मारहाण करण्यात आली.

पश्चिम बंगालचे भाजपाचे केंद्रीय सह प्रभारी अमित मालवीय यांनी या घटनेची माहिती ट्विट करून दिली आहे. तसेच या घटनेवरून मालवीय यांनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर जोरदार टीका केली आहे. तर भाजपच्या खासदार लॉकेट चटर्जी यांनी या घटनेचा व्हिडीओ ट्विटरवर पोस्ट केला आहे.