ऐकावं ते नवलच..! सबसे कातील गौतमी पाटीलने चक्क बैलासमोर लगावले ठुमके

मुळशी- गौतमी पाटील (Gautami Patil) हे नाव महाराष्ट्रात सातत्याने चर्चेत असते. तरुणांमध्ये नृत्यांगणा गौतमीची क्रेझ इतकी वाढली आहे की, गावच्या प्रत्येक कार्यक्रमाला तिला डान्स ठेवला जातो. वाढदिवसाचा कार्यक्रम असो, गावची जत्रा असो किंवा अन्य कोणता सांस्कृतिक कार्यक्रम असो नृत्यांगणा गौतमीचा डान्स असतो म्हणजे असतोच. तिच्या कार्यक्रमांना प्रेक्षकांची मोठी गर्दीही होत असते. मात्र यावेळी थोडं वेगळंच दृश्य पाहायला मिळालं आहे. पुण्यातील मुळशीत गौतमीचा कार्यक्रम आयोजण्यात आला होता, या कार्यक्रमात गौतमी चक्क बैलासमोर नाचली आहे.

सुशील हगवणे युवा मंचाने गौतमीच्या कार्यक्रमासाठी भला मोठा स्टेज बांधला होता. प्रचंड मोठ्या आणि मोकळ्या मैदानात हा स्टेज बांधला होता. या मैदानात लोकांची प्रचंड गर्दी होईल असा अंदाज होता. पण प्रत्यक्षात उलटं घडलं. कार्यक्रमाला एकही माणूस उपस्थित नव्हता. मात्र मुळशी गावातील बैलगाडा शर्यतीतील सर्वांचा लाडका बैल बावऱ्यासमोर गौतमी पाटील आणि तिचे सहकलाकार चक्क दोन तास नाचले. असं पहिल्यांदाच घडलं असून सर्वांना आश्चर्य वाटलं.