महिलांनी कुठेतरी जपून ठेवलेल्या नोटा असतात, आता त्या… ; अजित पवारांचा मोदी सरकारवर निशाणा

2000 Currency Notes: सरकारने 2000 रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्याचा निर्णय घेतला आहे. याची घोषणा करताना आरबीआयने सांगितले की, क्लीन नोट पॉलिसी (Clean Note Policy) अंतर्गत आरबीआयने 2000 रुपयांच्या नोटा चलनातून काढून घेण्याचा निर्णय घेतला आहे. 2000 रुपयांची नोट चलनात बंद होऊ शकते परंतु 2000 रुपयांची नोट कायदेशीररित्या वैध राहील. आरबीआयने म्हटले आहे की 30 सप्टेंबर 2023 पर्यंत बँकांमध्ये 2000 रुपयांच्या नोटा बदलता येतील. तसेच, बँका आणि RBI च्या 19 प्रादेशिक कार्यालयांमध्ये 2000 रुपयांच्या नोटा इतर मूल्यांच्या चलनासोबत बदलल्या जाऊ शकतात.

दरम्यान, या निर्णयावर आता विधानसभेतील विरोधीपक्षनेते अजित पवार यांनी टीका केली आहे. आतापर्यंत असे धरसोड निर्णय कधी घेतले गेले नसल्याचे त्यांनी सांगितले. ते म्हणाले, काय चाललंय हे…काल फतवा काढला 2 हजारची नोट बंद… यापूर्वी नोटबंदी झाली होती. मग त्यावेळी दोन हजाराच्या नवीन नोटा आणल्या गेल्या होत्या. परंतु काही वर्षात ही नोटबंदी पुन्हा आली. देशहितासाठी काही निर्णय असेल तर आमचा नेहमी पाठिंबा आहे. परंतु केंद्र सरकार ज्या पद्धतीने निर्णय घेत आहे, ते आतापर्यंत कोणत्याही सरकारने घेतले नाही. आता केलेली दोन हजाराची नोट बंदी असाच प्रकार आहे.

तुम्ही म्हणतात, यामुळे काळा पैसा बाहेर येईल. तसे असेल तर चांगलेच आहे. परंतु महिलांनी कुठेतरी जपून ठेवलेल्या नोटा असतात. त्या पुन्हा त्यांना बदलण्यास जावे लागले. अन् विसरल्या म्हणजे गेले पैसे…दोन हजाराच्या नोटा बंद करण्याचे कारण काय? तेही केंद्र सरकार किंवा आरबीआयने सांगितले पाहिजे.असं देखील पवार यांनी म्हटले आहे.

PM Modi ने आज खींच दी बड़ी लकीर, कहा- 2047 तक विकसित देश बन जाएगा भारत! -  India is targeting to become a developed nation by 2047 says PM Narendra  Modi tutc - AajTak