तरुणाईतच टक्कल पडलंय? Hair Transplantद्वारे परत मिळवा घनदाट केस, जाणून घ्या त्याबद्दल

Hair Transplant Surgery: मला टक्कल तर पडणार नाही ना! प्रत्येक वेळी आरशात केस विंचरताना हा विचार तुमच्या मनात येत असेल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. चांगल्या व्यक्तिमत्त्वासाठी डोक्यावरचे केस किती महत्त्वाचे असतात हे आपल्या सर्वांनाच माहीत आहे, परंतु नवीन जीवनशैली आणि अनुवांशिक कारणांमुळे आजकाल टक्कल पडण्याची समस्या खूप वाढली आहे. विशेषत: तरुणांची वाईट जीवनशैली आणि सर्व प्रकारच्या चुकीच्या सवयींमुळे त्यांना लहान वयातच टक्कल पडण्याचा धोका निर्माण होत आहे, त्यामुळे त्यांचा आत्मविश्वास तर कमी होत आहेच, शिवाय ते त्यांच्या सामाजिक जीवनाकडेही दुर्लक्ष करू लागले आहेत. आणि कदाचित यामुळेच लोक हळूहळू केस प्रत्यारोपण शस्त्रक्रियेकडे (Hair Transplant) वळत आहेत.

केस प्रत्यारोपण म्हणजे काय?
केस प्रत्यारोपण म्हणजे काय आणि ते कसे केले जाते? ते जाणून घ्या. वास्तविक केस प्रत्यारोपण ही अशी शस्त्रक्रिया पद्धत आहे, ज्या अंतर्गत केसांचे प्रमाण जास्त असलेल्या ठिकाणाहून केस घेतले जातात, जसे की डोक्याच्या मागच्या बाजूला किंवा दोन्ही बाजूचे, आणि केस नसलेल्या ठिकाणी लावले जातात.

ही संपूर्ण प्रक्रिया तज्ज्ञ डॉक्टर आठ ते दहा आठवड्यात करतात. डॉक्टरांच्या मते, काही लोकांच्या डोक्यावर जास्त केस नसल्यामुळे त्यांच्या छातीचे आणि दाढीचे केस देखील डोक्यावर लावले जाऊ शकतात, परंतु सामान्यतः डोक्याचे केस इतर भागात लावले जातात.