सर्व एफआयआर बेकायदा असून माझी अटकही बेकायदा आहे, मला नुकसानभरपाई द्या – केतकी चितळे

मुंबई – राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar)यांच्याबाबतच्या आक्षेपार्ह फेसबुक पोस्ट केल्याप्रकरणी अटकेत असलेली अभिनेत्री केतकी चितळे (Ketaki Chitale )ही पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. राज्यात २२ ठिकाणी गुन्हे दाखल झाल्यापासून केतकी गेल्या अनेक दिवसांपासून ती जेलमध्ये आहे .

दरम्यान, वेगेवगेळ्या पोलीस स्थानाकांमधील तक्रारींच्या आधारे दाखल करुन घेण्यात आलेल्या सर्व एफआयआर बेकायदा असून माझी अटकही बेकायदा आहे, असा दावा अभिनेत्री केतकी चितळेनं केलाय. आपल्याला अटक करताना व्यक्तीस्वातंत्र्याच्या कायद्याचा भंग (Violation of individual liberty law) करण्यात आला असल्याने आपल्याला नुकसानभरपाई (Compensation) देण्यात यावी अशी मागणीही केतकी चितळेनं न्यायालयाकडे याचिकेद्वारे केली आहे.

‘ज्या व्यक्तींनी पोलीस स्थानकामध्ये तक्रार दाखल केलीय त्यांच्या नावाचा पोस्टमधील कवितेमध्ये उल्लेख नाही. ही कथित आक्षेपार्ह कविता पवार नावाच्या व्यक्तीला उद्देशून आणि त्या व्यतीला दुखावणारी आहे असं गृहित धरलं तरी तक्रार करणाऱ्यांपैकी कोणत्याच व्यक्तीचं नाव पवार नाहीय. या संदर्भात पवार नावाच्या कोणत्याही व्यक्तीने पोलिसांकडे लेखी तक्रार दिलेली नाही. मग पोलीस मला अटक कशी करु शकतात?’, असा प्रश्न याचिकेद्वारे केतकीकडून उपस्थित करण्यात आलेला आहे.