‘पंतप्रधानांचा होत असलेला अवमान पाहून इथल्या काही मुघलांच्या औलादीना आनंदाच्या उकळ्या फुटत आहेत’

पुणे – भाजपच्या नेत्यांनी मोहम्मद पैंगबर (Prophet Muhammad) यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने वादाला तोंड फुटलंय. अरबच्या दुतावासाने भारताला यासंदर्भात विचारणा केल्यानंतर  भाजप प्रवक्त्या नुपूर शर्मांची हकालपट्टी (BJP spokesperson Nupur Sharma fired) झाली आहे. नवीनकुमार जिंदाल (Naveen Kumar Jindal) यांच्यावरही कारवाई करण्यात आली.

या दरम्यान आणखी एका वादाला तोंड फुटलंय. अरब देशातील कचराकुंड्यांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे फोटो (Photo of Prime Minister Narendra Modi on garbage cans) लावण्यात आले आहेत. यामुळे नवा वाद निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर भाजप नेते प्रदीप गावडे यांनी केलेले एक ट्वीट सध्या बऱ्याच चर्चेत आहे.

ते म्हणाले, काही आखाती देशांमध्ये भारताचा होत असलेला विरोध, भारताविरोधात होत असलेले ट्रेंड, पंतप्रधानांचा होत असलेला अवमान पाहून इथल्या काही मुघलांच्या औलादीना आनंदाच्या उकळ्या फुटत आहेत, यांची निष्ठा कोणाशी आहे हे वारंवार यांच्या वागण्यातून स्पष्ट होते. असं गावडे म्हणाले.