महायुतीच्या सर्व नेत्यांच्या साक्षीने ४५ + जागा घेऊनच राज्यामध्ये महायुती जिंकेल – Sunil Tatkare

Sunil Tatkare: महायुतीच्या सर्व नेत्यांच्या साक्षीने ४५ + जागा घेऊनच राज्यामध्ये महायुती जागा जिंकेल असा निर्धार व्यक्त करतानाच आज गतीमान महायुती सरकारच्या माध्यमातून जे काम होत आहे त्यामुळे नक्कीच महायुतीला यश मिळेल, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि रायगड लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार खासदार सुनिल तटकरे (Sunil Tatkare) यांनी महायुतीच्या विराट सभेत व्यक्त केला.

रायगड लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी महायुतीच्या विराट जाहीर सभेतून सुनिल तटकरे यांनी निवडणुकीचे रणशिंग फुंकले.

१८ व्या लोकसभेची निवडणूक ही जगाच्या पाठीवरचे देशाचे स्थान बळकट करणारी निवडणूक असून पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वामध्ये वेगवेगळ्या योजना आणि महत्त्वाची काम होत असल्याचे सुनिल तटकरे यांनी अभिमानाने सांगितले.

अनंत गीते यांच्यामागे शिवसेना या चार अक्षरांची ताकद नसती तर त्यांचा निकाल तेव्हाच लागला असता. नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात पाच वर्षे आपल्याला काम करण्याची संधी मिळाली. मात्र आपण गीते यांचे एक काम दाखवा आणि बक्षीस घेऊन जा. एका गोष्टीचे वाईट वाटते, पत्रकार मित्रांनी गीतेंना प्रश्न विचारला ; कोरोना, चक्रीवादळ या संकटात तुम्ही कुठे होता? त्यावेळी ते हसत होते. नैसर्गिक आपत्तीला हसणारा लोकप्रतिनिधी असतो, हे माझ्या राजकीय जीवनात पहिल्यांदा पाहायला मिळाले अशी खंत सुनिल तटकरे यांनी व्यक्त केली.

निवडून आल्यावर मी येणारी पाच वर्षे महायुतीचा खासदार म्हणूनच काम करणार आहे. केंद्र सरकारच्या विविध योजना अनेक वर्षे या मतदारसंघांमध्ये येण्याची वाट पाहत होत्या, नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली देशात तिसऱ्यांदा महायुती सत्तेत आल्यानंतर त्या आणण्यासाठी मी वचनबद्ध असल्याचा शब्द यावेळी सुनिल तटकरे यांनी दिला.

खासदार सुनिल तटकरे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी महायुतीची विराट सभा अलिबाग येथे पार पडली. या विराट सभेनंतर खासदार सुनिल तटकरे यांनी उमेदवारी अर्ज महायुतीच्या नेत्यांच्या उपस्थितीत दाखल केला.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

Amol Kolhe | ‘आमच्या गावासाठी पाच वर्षांत काय केले?’ करंदी ग्रामस्थांचा अमोल कोल्हेंना थेट सवाल

Murlidhar Mohol | मनसेच्या साथीनं महायुतीचे मताधिक्य वाढणार!, मुरलीधर मोहोळ यांनी घेतली अमित ठाकरेंची भेट

Narendra Modi | मोदीजींची विकेट काढायला विरोधकांकडे ना बॉलर ना बॅट्समन, शिंदेंचा विरोधकांवर घणाघात