Murlidhar Mohol | मनसेच्या साथीनं महायुतीचे मताधिक्य वाढणार!, मुरलीधर मोहोळ यांनी घेतली अमित ठाकरेंची भेट

Murlidhar Mohol Meets Amit Thackeray | महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी भाजपाला बिनशर्त पाठींबा दर्शवला आहे. भाजपा तसेच महायुतीच्या उमेदवारांसाठी मनसेचे नेते प्रचाराच्या मैदानात उतरणार आहेत. अशातच महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांनी राज ठाकरेंचे सुपुत्र अमित ठाकरे यांची भेट घेतली आहे. मनसेचे कार्यकर्ते महायुतीच्या प्रचारात सक्रिय होणार असल्याची माहिती याप्रसंगी देण्यात आली.

मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol) यांनी मनसेचे नेते अमित राज ठाकरे यांची आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पुणे शहर कार्यालयात सदिच्छा भेट घेतली. यावेळी अमित ठाकरेंनी मनसेची संपूर्ण पुणे शहर संघटना आपल्या प्रचारात असेल, असा विश्वास दिला.

यावर पुणे लोकसभेचे महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ म्हणाले की, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतल्याबद्दल धन्यवाद. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने घेतलेल्या भूमिकेमुळे महायुतीची ताकद नक्कीच वाढली असून शहरभर असलेले मनसेचे संघटन पुणे लोकसभेत महायुतीचे मताधिक्य वाढवण्यास मोठा हातभार लावतील.

यावेळी मनसेचे नेतेबाबू वागसकर, सरचिटणीस रणजीत शिरोळे, सरचिटणीस बाळा शेडगे, सरचिटणीस अजय शिंदे, शहराध्यक्ष साईनाथ बाबर यांच्यासह माझ्यासमवेत भाजपा प्रदेश उपाध्यक्ष राजेश पांडे, शहराध्यक्ष धीरज घाटे, हेमंत रासने यांच्यासह पदाधिकारी समवेत होते.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

Ajit Pawar | भावनिक न होता देशाच्या भवितव्यासाठी महायुतीला मतदान करा; माजी सैनिकांच्या मेळाव्यात अजित पवारांचे आवाहन

Shivajirao Adhalrao Patil | “जनतेच्या प्रेमाची कळवळ म्हणून मी राजकारणात”, आढळराव पाटलांनी व्यक्त केल्या भावना

Ravindra Dhangekar | पुण्याच्या विकासापेक्षा धंगेकरांसाठी टिका टिपण्णी महत्त्वाची; व्हिजनच्या नावानेही बोंबाबोंब