Amol Kolhe | ‘आमच्या गावासाठी पाच वर्षांत काय केले?’ करंदी ग्रामस्थांचा अमोल कोल्हेंना थेट सवाल

Amol Kolhe | शिरूर लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार व महाविकास आघाडीचे उमेदवार अमोल कोल्हे हे एकदा निवडून आल्यानंतर पाच वर्षे मतदारसंघात फिरकलेही नसल्याचा आरोप महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील (Shivajirao Adhalarao Patil) यांनी केला होता. शिरूरमधील जनतेतही अमोल कोल्हेंबाबत नाराजी आहे. अशातच एका ग्रामस्थाने अमोल कोल्हेंना ‘आमच्या गावासाठी तुम्ही काय केले?’, असा धडधडीत प्रश्न विचारला. त्यामुळे अमोल कोल्हेंची कोंडी झाली.

कोल्हे (Amol Kolhe ) शिरूर तालुक्याच्या गावभेट मंगळवारी दौऱ्यावर होते. करंदी गावात त्यांचे शाल देऊन स्वागत झाले. त्यावेळी एका गावकऱ्याने व्यासपीठावरच त्यांना ‘पाच वर्षे झाली, करंदी गावासाठी काय केले, हे आपण आपल्या भाषणात सांगावे,’ अशी आवाहनवजा सूचना केली. त्याला थेट उत्तर न देता, “आपल्या अगोदरच्या खासदारांनी (आढळराव) दहा वर्षांत एक पत्रकार परिषद घेतली नाही,” असा आरोप कोल्हेंनी भाषणात केला.

“मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री माझ्यासारख्या शेतकऱ्याच्या मुलाच्या विरोधात अनेक वेळा शिरूरमध्ये येऊन गेले. केंद्रीय मंत्रीही येतील,’ असे सांगत करंदी गावासाठी ‘पाच वर्षांत काय केले,” या मूळ प्रश्नाला मात्र कोल्हेंनी खुबीनं बगल दिली.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

Ajit Pawar | भावनिक न होता देशाच्या भवितव्यासाठी महायुतीला मतदान करा; माजी सैनिकांच्या मेळाव्यात अजित पवारांचे आवाहन

Shivajirao Adhalrao Patil | “जनतेच्या प्रेमाची कळवळ म्हणून मी राजकारणात”, आढळराव पाटलांनी व्यक्त केल्या भावना

Ravindra Dhangekar | पुण्याच्या विकासापेक्षा धंगेकरांसाठी टिका टिपण्णी महत्त्वाची; व्हिजनच्या नावानेही बोंबाबोंब