Amit Shah | भारत-म्यानमार दरम्यानच्या संपूर्ण सीमेवर कुंपण घालण्याचा केंद्र सरकारचा निर्णय

Amit Shah : भारत-म्यानमार (India-Myanmar) यांच्यातील एक हजार 643 किलोमीटर लांबीच्या सीमेवर संपूर्ण कुंपण घालण्याचा निर्णय केंद्र सरकारनं (Central Govt) घेतला असल्याचं गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांनी म्हटलं आहे. सीमेजवळ आणखी खबरदारी घेण्याच्या दृष्टीनं गस्त घालण्याचा स्वतंत्र मार्ग तयार करण्यात येणार असल्याचंही त्यांनी काल आपल्या समाजमाध्यमांवरील पोस्टमध्ये म्हटलं आहे.

सीमेच्या एकंदर लांबीपैकी मणिपूरमधील मोरेहजवळच्या दहा किलोमीटरच्या सीमेवर सध्या कुंपण घालण्यात आलं आहे. याखेरीज हाइब्रिड खबरदारी प्रणाली अंतर्गत कुंपण घालण्याच्या दोन योजनांवर काम सुरु असून या योजनांतर्गत अरुणाचल प्रदेश (Arunachal Pradesh) आणि मणिपूरमध्ये (Manipur) एक एक किलोमीटर सीमेवर कुंपण घालण्यात येणार आहे, असंही शहा यांनी म्हटलं आहे.

मणिपूरमध्ये सुमारे वीस किलोमीटर सीमेवर कुंपण घालण्याच्या कामाला मंजुरी देण्यात आली असून हे काम लवकरच सुरु होणार आहे. देशांच्या सर्व सीमा अभेद्य बनविण्यासाठी मोदी सरकार कटिबद्ध असल्याचं शहा यांनी या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या –

Breaking! राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्ह अजित पवारांचंच; निवडणूक आयोगाचा निर्णय

निखिल वागळेंच्या अडचणी वाढणार? पत्रकाराविरोधात सुनील देवधर यांच्याकडून पुणे पोलिसांत तक्रार

Jitendra Awhad | ज्या माऊलीने तुम्हाला सगळं दिलं, तिचं कुंकू कधी पुसलं जाईल याची वाट बघताय?