Amol kolhe | हद्द झाली! वधू-वराला आशीर्वाद देतानाही कोल्हेंच्या तोंडी राजकीय भाषा

Amol kolhe | सध्या राजकीय वातावरण लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने तापले आहे. राजकीय नेते मंडळी सर्वत्र अनेक ठिकाणी भाषणे करून आपल्याच पक्षाच्या उमेदवारांना निवडून देण्याचे आवाहन करत आहेत. मात्र राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे (Amol kolhe) यांनी चक्क विवाहासारख्या मंगल कार्याच्या ठिकाणी सुद्धा राजकीय वक्तव्य केल्याने राजकीय नेतेमंडळींच्या नैतिकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागली आहेत.

नेमकं काय घडलं ?

पुण्यातील शिरूर येथे दिलीप मोहिते पाटलांच्या पुतणीच्या विवाह सोहळ्यात अमोल कोल्हेंनी केलेले वक्तव्य चर्चेत आहे. घड्याळ गेलं, वेळ जुळली नाही पण वधुवरांच्या सुखाची ‘तुतारी’ वाजली पाहिजे, असं म्हणत अमोल कोल्हे यांनी लग्नाच्या मंडपातच प्रचाराचे फटाके फोडले.

दरम्यान, यावर राष्ट्रवादीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटीलांनी (shivaji adhalrao patil) निशाणा साधला आणि ते म्हणाले, मंगलमय कार्यक्रमात वाचाळविरांसारखं बरळणं योग्य नाही, असे म्हणत खोचक टोला लगावला. अमोल कोल्हे यांच्या या शुभेच्छा म्हणजे मंगलमय चांगल्या कार्यात वाचाळविरासारखं बरळं असं म्हणत आढळराव पाटीलांनी कोल्हेंवर पलटवार केल्याचे पाहायला मिळाले.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

Murlidhar Mohol | मुरलीधर मोहोळांना मिळणार आता देवधरांचीही साथ

मतदारसंघात न फिरकल्याचा अमोल कोल्हे यांना बसणार फटका? नागरिकांची नाराजी शिवाजी दादांच्या पथ्यावर

Muralidhar Mohol | मुरलीधर मोहोळ यांचे मताधिक्य वाढविण्यासाठी चंद्रकांतदादा मैदानात; मॅरेथॉन बैठकांचा लावला धडाका