एकनाथ शिंदेंच्या पाया पडतानाचा व्हिडिओ WhatsApp ग्रुपवर, चिडून मिटकरींनी उचललं ‘हे’ पाऊल 

अकोला –  अकोल्यातील ‘मराठा हॉटेल मित्र परिवार’ या व्हॉट्सअप ग्रुप वर  एका व्यक्तीने राष्ट्रवादीचे विधानपरिषद आमदार अमोल मिटकरी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पाया पडल्याचा जुना व्हिडिओ शेअर केला. या प्रकारानंतर आमदार मिटकरी चिडले अन् या ‘ग्रूपवर’ हे असे टाकून अपमान करत असाल, तर मी ग्रूपमधून लेफ्ट होतो. अर्धवट अक्कल पाजळणाऱ्यांनी पूर्ण माहिती घेऊन बोलावं, असं सांगत मिटकरींनी ग्रुप लेफ्ट केल्याचं समोर आलं आहे.

अकोल्यातील ‘मराठा हॉटेल मित्र परिवार’ या व्हॉट्सअप ग्रुप’वर झुरळ खुर्द या गावातल्या समस्येवर चर्चा सुरू होती.एका बाजूला ही चर्चा सुरु असताना प्रशांत रत्नपारखी या व्यक्तीने अमोल मिटकरी एकनाथ शिंदे यांच्या पाया पडण्याचा जुना व्हिडिओ ग्रुपवर शेअर केला. मात्र या प्रकारानंतर आमदार अमोल मिटकरी चिडले.

या व्हॉट्सअप ग्रूपवर हे असे टाकून अपमान करत असाल तर मी ग्रुप मधून लेफ्ट होतो. अर्धवट अक्कल पाजळणाऱ्यांनी पूर्ण महिती घेऊन बोलावं, असा मजूकर लिहित मिटकरी ग्रुपच्या बाहेर पडले.दरम्यान, आता या मुद्द्यावरून अमोल मिटकरी यांना ट्रोल केले जात आहे.