Prithvi Shaw | आयपीएल दरम्यान पृथ्वी शॉ नवीन घरात झाला शिफ्ट, फ्लॅटची किंमत ऐकून तुम्हाला धक्का बसेल!

Prithvi Shaw New House | भारतीय क्रिकेटपटू पृथ्वी शॉने मुंबईत एक आलिशान घर विकत घेतले आहे, ज्याचे फोटो त्याने त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केले आहेत. सध्या पृथ्वी शॉ आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्सकडून खेळताना दिसत आहे. शॉने (Prithvi Shaw) आतापर्यंत खेळलेल्या सामन्यांमध्ये चमकदार कामगिरी केली आहे. मुंबईतील वांद्रे येथे घर खरेदी केल्याची माहिती त्याने त्याच्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवरून शेअर केली.

इंस्टाग्रामवर पोस्ट करत त्याने लिहिले की, ‘तुमच्या जागेवर चावी फिरवणे ही एक खास भावना आहे. या क्षणाची स्वप्ने पाहण्यापासून ते जगण्यापर्यंतचा प्रवास खूप झाला आहे. माझा स्वर्गाचा तुकडा मिळाल्याबद्दल मी खूप कृतज्ञ आहे. गुड टाइम्स रोल करू द्या’. मिळालेल्या माहितीनुसार, शॉने हे घर मुंबईतील वांद्रे येथे 10.5 कोटी रुपयांना विकत घेतले आहे. त्याने आपल्या घराचे फोटो शेअर केले आहेत. त्याच्याकडे बघून त्याचे घर स्वर्गाहून कमी वाटत नाही.

दरम्यान, गेल्या काही काळ पृथ्वीसाठी चांगला राहिलेला नाही. त्याला टीम इंडियातून वगळण्यात आले आणि त्यानंतर सपना गिलनेही त्याच्यावर विनयभंग आणि मारहाणीचा गुन्हा दाखल केला. या सगळ्यानंतर पृथ्वी शॉ खूप मजबूत दिसत आहे आणि तो हे सर्व मागे टाकून पुढे जात आहे. आता त्याने दिल्ली कॅपिटल्ससाठी या मोसमात 3 सामन्यांच्या 3 डावात 1 अर्धशतकासह 119 धावा केल्या आहेत.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

Murlidhar Mohol यांच्या प्रचारात ‘होम मिनिस्टर’ही सक्रिय! मोनिका मोहोळांचा ६ विधानसभा मतदारसंघातील भेटीगाठींचा टप्पा पूर्ण

Pune LokSabha 2024 | मनसेने महायुतीला पाठिंबा दिल्याने पुण्यात मतांचं विभाजन, मुरली अण्णांना होणार फायदा?

Shirur LokSabha 2024 | फक्त पोपटपंची करणारा नव्हे तर प्रत्येकाच्या अडीअडचणीत धावून येणारा खासदार हवा- जुन्नरचे आमदार अतुल बेनके