‘अडीच वर्ष फोटोग्राफर सुसाट सुटलेला…’; अतुल भातखळकरांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

मुंबई : –  राज्याच्या राजकारणात भूकंप घडवून, शिवसेनेच्या (Shivsena) नेतृत्वाला आव्हान देऊन आज एकनाथ शिंदे सरकारने आपलं बहुमत सिद्ध केलं. अनेक अडचणी समोर असतानाही एकनाथ शिंदेंनी ही किमया करुन दाखवली.   एकनाथ शिंदे- देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) सरकारचा नुकताच शपथविधी झाला. तर विधानसभेतील दोन दिवसीय विशेष अधिवेशनात एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस सरकारनं बहुमतापेक्षा मोठा आकडा गाठून आपलं सरकार मजूबत असल्याचं दाखवून दिलंय.

यादरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) यांच्यावर टीका करताना माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी शिंदेना रिक्षावाला (Rickshaw Driver) असे संबोधले होते. ‘ काल रिक्षावाल्याची रिक्षा सुसाट सुटली होती’ असे ठाकरे म्हणाले होते.

मात्र, आता या वादात भाजप नेते अतुल भातखळकर (BJP leader Atul Bhatkhalkar) यांनी देखील उडी घेतली असल्याचे निदर्शनास येत आहे. ‘अडीच वर्ष फोटोग्राफर सुसाट सुटलेला…’ असे म्हणत भातखळकर यांनी मोजक्या शब्दांत उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे.