“वंचितला वापरण्याचा प्रयत्न केलात तर मोदींबरोबर…”, आंबेडकरांचा MVAला इशारा

Prakash Ambedkar : महाविकास आघाडीचं सरकार (MVA) जाऊन दोन वर्षे ओलांडली आहेत. तरीही यांचा काही समजोता झाला नाही. अजून 48 जागांचं (Lok Sabha Election 2024) वाटप नाही. मला शंका येतेय की यांना खरंच भाजपला (BJP) हारवायचं का? काँग्रेस (Congress) म्हणते आमचंच पक्क झालं नाही, मग तुम्हाला कुठून दोन जागा देणार. यांना फक्त कुणीतरी कुर्बाणीचा बकरा हवंय. ते बकरा आम्ही होणार नाही, असे वंचितचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) म्हणाले.

प्रकाश आंबेडकर महाविकास आघाडीला उद्देशून म्हणाले, तुम्ही आम्हाला चर्चेत घेतलं तर आम्ही तुमच्याबरोबर आहोत. परंतु, तुम्ही जसं इथल्या गरीब मराठ्यांना आतापर्यंत वापरत आलेले आहात त्याच पद्धतीने वंचितला वापरण्याचा विचार केला तर मोदींबरोबर आम्ही तुम्हालाही गाडू एवढं लक्षात ठेवा.

शिवाजी मानकर

वंचितला सोबत न घेतल्यास तुमची सत्ता येणार नाही आणि काँग्रेस नेत्या सोनिया गांधींपासून इतर अनेक काँग्रेस नेते तुरुंगात दिसतील, महाविकास आघाडीबरोबर युती झाली नाही, तर वंचित बहुजन आघाडी लोकसभेच्या सर्व ४८ जागा लढवेल.जागावाटप लवकर करा, समजोता करा नाहीतर जेलमध्ये गेल्याशिवाय तुम्ही राहणार नाही. मोदी बरोबर आम्ही तुम्हालाही गाडल्या शिवाय राहणार नाही, असा इशारा महाविकास आघाडीला आंबेडकरांनी दिला.

महत्वाच्या बातम्या-

मंदिर नको तर रोटी, कपडा, मकान, शिक्षण आणि आरोग्य हवंय; नक्षलवाद्यांची कोल्हेकुई झाली सुरु

Ram Mandir Pran Pratishta : राम मंदिरातील प्राणप्रतिष्ठा सोहळा थांबवला जाणार?

Women’s Health: 50 व्या वर्षी निरोगी राहू इच्छिता? रोज ही एक गोष्ट खायला सुरुवात करा