Uddhav Thackeray | राम मंदिर भाजपाने बांधलेलं नाही; उद्धव ठाकरेंचे मोठे वक्तव्य

Uddhav Thackeray |  “भाजपाने आधी रोजी-रोटीबद्दल बोलायला हवं. शेतकरी-महिला-गरीब-तरुण या मुद्द्यावर की हिंदुत्वाच्या मुद्द्यावर… ते कोणत्या मुद्द्यावर लढत आहेत हे त्यांनी सांगावं? राम मंदिर भाजपाने बांधलेलं नाही, हा न्यायालयाचा निर्णय होता,” असा दावा शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी केला आहे. इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या विशेष मुलाखतीत ते बोलत होते.

आपल्या विधानाबाबत सविस्तर सांगताना उद्धव ठाकरे म्हणाले, “बाबरी मशीद पाडण्याची जबाबदारी शिवसेनेने घेतली, मुख्यमंत्री म्हणून मी विधानसभेत हिंदुत्वावर बोललो आहे. लोकांना ते माहीत आहे. पण आज माझ्यासाठी सर्वात मोठा मुद्दा हा आहे की, मला मोदी सरकार नाही तर भारत सरकार हवं आहे. जर एकच पक्ष असेल तर ते देशासाठी सर्वात धोकादायक आहे.”

“माझ्या वडिलांच्या काळात एक मजबूत सरकार असावे असे आम्हाला वाटत होते, पण अटलजींनी आघाडीचे सरकार यशस्वीपणे चालवले, नरसिंह राव यांच्या सरकारने आर्थिक सुधारणा आणल्या. आता काळाप्रमाणे देशाला अशा सरकारची गरज आहे जे अनेक पक्षांना सोबत घेईल” असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

Shivajirao Adhalrao Patil Vs Amol Kolhe : आढळराव पाटील आणि अमोल कोल्हे यांचा उद्या भोसरी विधानसभेत प्रचार दौरा

Baramati Loksabha | सुप्रिया सुळे आणि वहिनी सुनेत्रा पवार यांच्यात कोणाकडे आहे जास्त संपत्ती?

Madhav Bhandari | ‘देव-धर्माचा विषय शरद पवारांच्या “सात बाऱ्या’ वर कधीच दिसला नाही, त्यामुळे…’, माधव भंडारी यांचा टोला