“मनु संपला असं वाटत होतं, पण…”; अमोल मिटकरींचा संभाजी भिडेंवर हल्लाबोल

Mumbai – शिवप्रतिष्ठानचे प्रमुख संभाजी उर्फ मनोहर भिडे (Sambhaji Bhide )यांनी महात्मा गांधी यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य सध्या चांगलेच चर्चेत आहे. भिडे यांच्या वक्तव्यानंतर राजकीय नेत्यांकडून प्रतिक्रिया दिल्या जात आहेत. पावसाळी अधिवेशनातही याचे पडसाद उमटत आहेत. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी राज्यात अनेक ठिकाणी संभाजी भिडे यांच्याविरोधात आंदोलनं केली आहे. विशेष म्हणजे अजित पवारांच्या गटाने देखील भिडे यांच्याविरोधात मोर्चा उघडला आहे. संभाजी भिडे यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून त्यांना अटक करावी, अशी मागणी विरोधी पक्षाकडून केली जात आहे.

दरम्यान, यावर आता अजित पवार गटाचे प्रवक्ते अमोल मिटकरी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी संभाजी भिडे यांचा थेट उल्लेख न करता त्यांची तुलना मनुशी केली आहे. मनुचा काळ संपला आणि मनुही संपला असं वाटत होतं. मात्र भिडूच्या रुपात मनु आजही जिवंत आहे, असं विधान अमोल मिटकरी यांनी केलं आहे.

अमोल मिटकरी ट्वीटमध्ये म्हणाले, “मी मनुस्मृती वाचली आहे. मनुस्मृतीमध्ये शूद्र आणि अंत्यज यांच्याविषयी किती विष पेरलंय, याची कल्पना ती वाचल्यानंतर विवेक जागृत असलेल्या वाचकांनाच येते. मनुचा काळ संपला आणि मनुही संपला, असं वाटत होतं. मात्र, या भिडूच्या रुपात मनु आजही जिवंत आहे.