अमोल शिंदेला कायदेशीर मदत करणार; असीम सरोदे यांची घोषणा

Asim sarode – १३ डिसेंबरच्या दिवशी म्हणजेच बुधवारी लोकसभेत घुसून दोन तरुणांनी धुराचे लोट पसरवले. संसदेतल्या खासदारांनी दोन्ही तरुणांना पकडलं आणि सुरक्षा दलांच्या ताब्यात दिलं. सुरक्षा दलांनी त्यांना दिल्ली पोलिसांच्या ताब्यात दिलं. या प्रकरणात आत्तापर्यंत सहा जणांना अटक करण्यात आली आहे. या सगळ्यांवर UAPA च्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, आतमध्ये ही घटना घडत असतानाच लोकसभेच्या बाहेर एक महिला आणि एक तरुण या दोघांनीही धूर पसरवत नारेबाजी केली. या महिलेचं नाव नीलम आणि मुलाचं नाव अमोल शिंदे (Amol Shinde) असल्याचं समजतं आहे. या सगळ्या आरोपींवर UAPA अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

एका बाजूला या घडामोडी घडत असताना आता अमोल शिंदेला कायदेशीर मदत करणार असल्याची घोषणा वकील असीम सरोदे यांनी केली आहे. ते म्हणाले, अमोल शिंदे याने काल संसदेत घुसून बेरोजगारीचा प्रश्न धुराचे नळकांडे फोडून मांडला. त्याने वापरलेली भगतसिंग स्टाईल लोकशाहीला साजेशी नाही. पण मग संसदेतील लोकही असे कोणते काम करीत आहेत ज्यातून अनेक हातांना रोजगार मिळेल, महागाई कमी होईल.

अमोलचा उद्देश जर कुणाला दुखावण्याचा व इजा करण्याचा नव्हता आणि त्याला केवळ बेरोजगारीचा मुद्दा त्याला मांडायचा होता तर त्याचे गुन्हेगारीकरण न करता बेरोजगारीचा प्रश्न समजून घेतला पाहिजे. आणि त्याने वापरलेल्या चुकीच्या मार्गाबद्दल जाणीव देऊन त्याला सकारात्मक शिक्षा जरूर करावी असे मला वाटते. असं सरोदे यांनी म्हटले आहे.

महत्वाच्या बातम्या-