Mukhtar Ansari | माझ्या वडिलांना त्यांच्या जेवणात विष देण्यात आले,हा मृत्यू नाही तर खून 

Mukhtar Ansari News | कुख्यात गँगस्टर मुख्तार अन्सारीचा मृत्यू झाला आहे. मुख्तार अन्सारी याला हृदयविकाराचा झटका आल्याने तो तुरुंगात बेशुद्ध अवस्थेत पडला होता. यानंतर त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असता उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाल्याची माहिती सांगण्यात येत आहे. मुख्तार अन्सारीवर गेल्या १४ तासांपासून ९ डॉक्टरांची टीम उपचार करत होती. मात्र, त्याचा जीव वाचवण्यात डॉक्टरांना अपयश आले आणि उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. गँगस्टर मुख्तार अन्सारी (Mukhtar Ansari) हा उत्तर प्रदेशच्या बांदा तुरुंगामध्ये शिक्षा भोगत होता.

चा धाकटा मुलगा उमर अन्सारी याने वडिलांच्या निधनानंतर आपल्या समर्थकांना कायद्याच्या दृष्टीने गुन्हा आहे असे कोणतेही काम करू नये, असे आवाहन केले आहे. ही हत्या असल्याचे उमरने सांगितले. याची चौकशी झाली पाहिजे. वडिलांनी विषबाधा झाल्याचे सांगितले होते. उमरने जेल प्रशासनावरही गंभीर आरोप केले. ते म्हणाले की सर्व काही स्पष्टपणे दिसत आहे. अब्बास यांच्या अंत्यसंस्कारासाठी मोठा भाऊ पॅरोल कोर्टात दाद मागणार आहे.

त्यांनी सांगितले की, माझ्या वडिलांना त्यांच्या जेवणात विष देण्यात आले असून त्यांच्यावर पूर्ण उपचार केले गेले नाहीत. हा मृत्यू नाही तर खून आहे. कायदेशीर मार्गाने तपास व्हावा यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करू असे देखील उमर अन्सारीने म्हटले आहे.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

शिवसेना शिंदे गटाने जाहीर केली उमेदवारांची पहिली यादी, पाहा कोणाला मिळालं तिकीट?

Nana Patole | लोकशाही व संविधान वाचवण्यासाठी लोकसभा निवडणुकीत एकजुटीने लढण्याची गरज

Prakash Ambedkar | ‘वंचितच्या पाठीत खंजीर खुपसला’! आंबडेकरांचा संजय राऊतांवर हल्लाबोल