अनंत अंबानी अन् राधिक मर्चंटचा ‘रोका’, साखरपुडा सोहळ्यातील फोटो सोशल मीडियावर व्हायरल

नवी दिल्ली: अंबानी कुटुंबात (Ambani Family) आज पुन्हा एकदा जल्लोषाचे वातावरण आहे. नुकतेच मुकेश (Mukesh Ambani) आणि नीता अंबानी (Nita Ambani) यांची मुलगी ईशा अंबानीने जुळ्या मुलांना जन्म दिला. भारतात त्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. यानंतर आता मुकेश आणि नीता अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी (Anant Ambani) याचा रोका अर्थातच साखरपुडा पार पडला आहे. अनंत अंबानींचा रोका राधिका मर्चंटसोबत झाला आहे. त्यांच्या साखरपुडा सेलिब्रेशनचे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. (Anant Ambani Radhika Merchant Roka Ceremony)

राजस्थानातील श्रीनाथजी मंदिरात झाला रोका
हा खास सोहळा पार पाडण्यासाठी संपूर्ण अंबानी आणि मर्चंट कुटुंब राजस्थानमधील राजसमंद जिल्ह्यातील नाथद्वारा येथे असलेल्या श्रीनाथजी मंदिरात पोहोचले. या जोडप्याच्या रोका समारंभातील पहिला फोटो समोर आला आहे. समोर आलेला हा फोटो थोडासा अस्पष्ट आहे, पण फोटोत अनंत आणि राधिका दिसत आहेत. यावेळी अनंत निळ्या रंगाचा कुर्ता पायजमा तर राधिका लाइट पिंक आणि रेड कलरच्या आउटफिटमध्ये दिसत आहे.

राधिका आणि अनंत एकमेकांना अनेक वर्षांपासून ओळखतात
अनंत आणि राधिका एकमेकांना खूप दिवसांपासून ओळखतात. अंबानी कुटुंबातील प्रत्येक फॅमिली फंक्शनमध्ये राधिका दिसली आहे. आता लवकरच ती अंबानी कुटुंबाची धाकटी सून होणार आहे.

कोण आहे राधिका मर्चंट, कोण होणार अंबानी कुटुंबाची धाकटी सून, काय करते ती? असे प्रश्न सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. तर आम्ही तुम्हाला सांगतो, राधिका ही वीरेन मर्चंट आणि शैला मर्चंट यांची मुलगी आहे. वीरेन हे एनकोर हेल्थकेअरचे सीईओ आहेत. राधिका आणि अनंत हे एकमेकांना लहानपणापासून ओळखतात. राधिका ही एक ट्रेंड भारतीय शास्त्रीय नृत्यांगना आहे. तुम्हाला आठवत असेल की या वर्षी जूनमध्ये अंबानी कुटुंबाने राधिका मर्चंटसाठी अरंगेत्रम सोहळा आयोजित केला होता.