ईडीच्या चौकशीला दांडी मारून अनिल परब साई दरबारी पोहोचले

शिर्डी – शिवसेनेचे नेते अनिल परब यांना ईडीचं समन्स आलं आहे. दापोली रिसॉर्ट प्रकरणात ईडीने त्यांना आज (15 जून) चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. मात्र या चौकशीला दांडी मारून परब हे साई दरबारी पोहोचले. साईबाबांच्या मध्यान्ह आरतीला लावली उपस्थिती.

मागील काही महिन्यांपासून अनिल परब ईडीच्या रडारवर आले आहेत. यातच ईडीने त्यांना काल समन्स बजवून आज चौकशीला हजर राहण्यास संगितले होते पण अनिल परब यांचा दौरा हा पूर्वनियोजित होता असं त्यांनी वकिलामार्फत आज उपस्थित राहू शकणार नसल्याचे कळवले आहे.

भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी त्यांच्यावर मनी लॉड्रिंगचा आरोप करत काही पुरावे ईडी कार्यालयात दाखल केले होते. त्यानंतर त्यांच्या निवासस्थानावर आणि त्यांच्याशी संबंधित काही लोकांच्या घरी ईडीने धाडी टाकल्या होत्या. त्यानंतर आता परब यांना चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले होते.