सांगली हादरली : एकाच कुटुंबातील नऊ जणांनी विष पिऊन जीवन संपवलं

सांगली – सांगलीमधील मिरज (Miraj) येथून एक धक्कदायक बातमी समोर आली आहे. येथे एकाच कुटुंबातील नऊ जणांनी सामूहिक आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मिरजेपासून १२ किमी अंतरावर असणाऱ्या म्हैसाळमधील अंबिकानगरमध्ये ही घटना घडली आहे. विष पिऊन कुटुंबाने आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती आहे. पोलीस सध्या घटनास्थळी दाखल झाले आहेत. आत्महत्येचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही.(family-commits-suicide-in-miraj)

माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, मिरजेमधील म्हैसाळ येथे रविवारी रात्री एकाच कुटुंबातील नऊ जणांनी विष पिऊन जीवन संपवलं. डॉक्टर माणिक वनमोरे यांचं हे कुटुंब असून मृतांमध्ये महिला आणि मुलांचाही समावेश आहे. सोमवारी सकाळी त्यांचे मृतदेह आढळल्यानंतर घटना उघडकीस आली. पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून तपास सुरु आहे. लोकसत्ताने याबाबत वृत्त दिले आहे.