भीमथडी जत्रा आजपासून पुणेकरांच्या भेटीला..!

पुणे : कोरोनामुळे मागील वर्षी भीमथडी जत्रा भरवण्यात आली नव्हती. मात्र या वर्षी कोव्हिड संदर्भातील शासनाचे सर्व नियम पाळून भीमथडी जत्रा उद्यापासून आपल्या भेटीला येत आहे.

आज अर्थात, 22 डिसेंबर रोजी दुपारी 4 वाजल्यापासून संध्याकाळी 10 व 23 ते 26 डिसेंबर सकाळी 10 ते संध्याकाळी 10 या वेळात अॅग्रीकल्चर महाविद्यालय मैदान, सिंचननगर, शिवाजीनगर, पुणे येथे पार पडणार असल्याचे भीमथडी जत्रेच्या आयोजिका सुनंदा पवार याांनी सांगितले. विशेष म्हणजे, कोरोना विरोधी 2 ही लसीकरण, ओळखपत्र, मास्क असणाऱ्यांनाचं या जत्रेचा आनंद घेता येईल, याची नोंद पुणेकरांनी घेणे गरजेचे आहे.

या वर्षी जत्रेत, महाराष्ट्र, गुजरात, वेस्ट बंगाल, कर्नाटक, आंद्रप्रदेश, उत्तरप्रदेश, छत्तीसगड, जम्मू कश्मीर, ओडीसा, हरियाणा या 10 राज्यांसह, महाराष्ट्रातील, पुणे, सातारा, सोलापूर, नाशिक, जळगाव, मुंबई, ठाणे, रत्नागिरी, अहमदनगर, बीड, औरंगाबाद, कोल्हापूर, धुळे, नंदुरबार, सांगली या 15 जिल्ह्यातील 230 दालन यावेळी, भीमथडीच्या माध्यमातून आपल्या भेटीला येत आहेत.

सिलेक्ट,यंग इंडिया, महिला बचत गट उत्पादने, फार्मर्स मार्केट, खाद्य महोत्सव आदी दालनांनी तसेच, हातमाग वस्तू, कापड, हस्तकला वस्तू, उन्हाळी पदार्थ, धान्य, कडधान्य, भाजीपाला, आदिवासी वस्तू यावेळच्या भीमथडीला रंगत आणतील हे नक्की.!

आपल्या वेगवेगळ्या थीमसाठी ओळखली जाणारी भीमथडी जत्रा या वर्षी पर्यावरण पूरक समृद्ध वसाहत व देवराई हा पर्यावरण संरक्षक संदेश घेऊन यावेळेस येत आहे. आता हा पर्यावरण पुरक भीमथडी संदेश पुणेकरांना किती भावतो हे 22 ते 26 डिसेंबरचं ठरवेल.