अनिल परब यांचं रिसॉर्ट दिवाळीपूर्वी जमीनदोस्त करणार; किरीट सोमय्या यांची गर्जना

Mumbai – ठाकरे सरकारमधील भ्रष्टाचाराचे प्रतीक असलेल्या अनिल परब यांचं ट्विन रिसॉर्ट दिवाळीच्या आधी जमीनदोस्त केल्याशिवाय राहणार नाही, असं भाजप नेते किरीट सोमय्या यांनी म्हटलं आहे. भिवंडी भाजपचे शहराध्यक्ष संतोष शेट्टी यांच्या धामणकर मित्र मंडळाने किरीट सोमय्या यांना गदा भेट म्हणून दिली. तीच गदा घेऊन परब यांच्या रिसॉर्टवर आपटणार असल्याचं त्यांनी म्हटलं.

राज्यात जल्लोषात गणेशोत्सवास सुरवात झाली असल्याने महाराष्ट्रात हिंदुत्वाचे राज्य आले असून एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या साक्षीने गणेशाच्या कृपेने मेट्रो पुन्हा एकदा रुळा वर आली आहे, पुढच्या काही दिवसात भिवंडीची मेट्रो देखील रुळावर येणार असल्याचा विश्वास देखील यावेळी सोमय्या यांनी व्यक्त केला.