पुणे : भाजपचे महापलिकेतील संख्या बळ वाढून ते ११० च्या पुढे जाईल – मुळीक 

पुणे : राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज स्थानिक स्वराज्य संस्था आणि महापालिका निवडणुकांबाबत एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. शिंदे सरकारने उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना आणखी एक मोठा धक्का दिला असून आता 2017 सालच्या प्रभाग रचनेप्रमाणेच राज्यात स्थानिक स्वराज्य संस्था आणि महापालिका निवडणुका होणार आहेत.

दरम्यान, या निर्णयाचे भाजप शहराध्यक्ष जगदीश मुळीक (Jagdish Mulik) यांनी स्वागत केले आहे. ते म्हणाले,महविकास आघाडी (MVA) सरकारने बेकायदेशीरपणे महापालिकेची सदस्य संख्या वाढवली होती. वास्तविक जनगणना पूर्ण झाल्यानंतर त्या प्रमाणात सदस्य संख्या वाढविणे अपेक्षित होते. परंतु महाविकास आघाडीने चुकीचा निर्णय घेतला होता.

प्रभागातील सदस्य संख्या तीन केली. नैसर्गिक सीमांचा विचार न करता अनिर्बंध पद्धतीने प्रभाग रचना केल्या. सत्तेचा दुरुपयोग केला. त्यामुळे अनेक होतकरू राजकीय कार्यकर्त्याची निवडणूक लढविण्याची संधी गमवावी लागली असती. आता भाजप सेनेच्या सरकारने पुन्हा चारचा प्रभाग केला आहे. या निर्णयाचे मी स्वागत करतो. भौगोलिक सलगतेमुळे सर्वांना समान संधी मिळेल. भाजपचे (BJP) महापलिकेतील संख्या बळ वाढून ते ११० च्या पुढे जाईल असा विश्वास वाटतो.असं ते म्हणाले.