मांसाहार केल्यानंतर देवदर्शन करू नये असं कुठेही शास्त्रात म्हटलं नाही, मी देखील अनेक वेळा… – काकडे

पुणे – राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) नेत्या तथा खासदार सुप्रिया सुळे (MP Supriya Sule) यांनी मटण खाऊन देवदर्शन घेतल्याचा गंभीर आरोप शिंदे गटाचे नेते विजय शिवतारे (Vijay Shivtare) यांनी केला आहे. शिवतारे यांनी फेसबूकवर (Facebook) एक व्हिडीओ शेअर करत हा आरोप केला. दरम्यान, या आरोपानंतर आता पुन्हा एकदा नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

सुप्रिया सुळे यांच्या या कृतीमुळे भावना दुखावल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. तसेच सुप्रिया सुळे यांचा मटण खातानाचा व्हिडीओही शेअर केला आहे. तसेच देवदर्शन घेतानाचे फोटोही शेअर केले आहेत. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

दरम्यान, राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते अंकुश काकडे यांनी यावर भाष्य केले आहे. ते म्हणाले, मांसाहार केल्यानंतर देवदर्शन करू नये असं कुठेही शास्त्रात म्हटलं नाही. मी देखील अनेक वेळा देवदर्शन केले आहे. परमेश्वर प्रति माझी श्रद्धा शुद्ध आहे. असं त्यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटले आहे. सोबतच कोण काय खातं,कुठं जातं हे सांगायला तुम्ही काय LIB त कामाला आहात का शिवतारे?असा सवालही त्यांनी दुसऱ्या एका पोस्टमधून केला आहे.