अंगणवाडी मदतनीस पदभरतीसाठी 27 जूनपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

लातूर : बालविकास प्रकल्प अधिकारी एकात्मिक बालविकास सेवा योजना लातूर ग्रामीण योजनेअंतर्गत लातूर तालुक्यातील पेठ येथे तीन, गंगापूर, पाखरसांगवी, वासनगाव, चिंचोलीराव, सावरगाव, टाकळी, 12 नंबरपाटी, चिखुर्डा, आर्वी, सोनवती, सारोळा, महाराणाप्रतापनगर, भडी, साई, दगडवाडी, कातपूर, बाभळगाव, धनेगाव येथील अंगणवाडीतील प्रत्येकी एक मदतनीसांचे पद (Anganwadi Helper Recruitment) भरण्यात येणार आहे. यासाठी या गावातील स्थानिक रहिवाशी असलेल्या पात्र महिलांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.

अंगणवाडी मदतनीस पदांसाठी 02 फेब्रुवारी 2023 रोजीच्या शासन निर्णयानुसार महिला उमेदवार भरण्यात येणार असून महिला 12 वी उत्तीर्ण असावी. अर्ज करण्यास इच्छुक असलेल्या महिला उमेदवारांनी माहितीसाठी बालविकास प्रकल्प अधिकारी, एकात्मिक बालविकास सेवा योजना कार्यालयाशी 14 ते 27 जून 2023 पर्यंत संपर्क साधावा. याच कार्यालयात अर्ज स्वीकारले जाणार आहेत.